भिवंडी महानगरपालिकेच्या बीलांवर उपायुक्तांच्या बोगस सह्या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:21 PM2019-02-01T22:21:42+5:302019-02-01T22:24:25+5:30

भिवंडी : महानगरपालिकेत कचरा ठेकेदाराच्या बीलांच्या नस्त्यांवर उपायुक्तांच्या बोगस सह्या असल्याचे उघडकीस आल्या असुन या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात ...

In the case of Bhiwandi Municipal Corporation, a case has been registered against the accused in connection with the bogus case | भिवंडी महानगरपालिकेच्या बीलांवर उपायुक्तांच्या बोगस सह्या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल

भिवंडी महानगरपालिकेच्या बीलांवर उपायुक्तांच्या बोगस सह्या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देदोन ठेकेदारांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल५ कोटी ४६ लाख ५८७ रूपयांचे बील मिळण्यासाठी नस्त्यांवर बोगस सह्या शहरातील कचरा उचलण्याचे काम करीत होते ठेकेदार

भिवंडी: महानगरपालिकेत कचरा ठेकेदाराच्या बीलांच्या नस्त्यांवर उपायुक्तांच्या बोगस सह्या असल्याचे उघडकीस आल्या असुन या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात दोन कचरा ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पालिकेच्या ठेकेदारांमध्ये खळबळ माजली आहे.
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी सुमारे एक कोटी रूपये खर्च केले जात आहेत. असे असताना कचरा ठेकेदार व काही सफाई कामगार योग्यरितीने काम करीत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच गेल्या काही वर्षापासून आरोग्य खात्यातील आधिकारी व कर्मचारी केवळ सर्वेक्षणाच्या निमीत्ताने रस्त्यावर काम करताना दिसतात.इतर वेळी शहरातील घाण कायम दिसून येते.मात्र त्यांची बीले व कर्मचाऱ्यांना पगार नियमीत दिला जातो,असा आरोप नागरिकांकडून होत असतो. या तक्रारी सुरू असताना पालिकेतील वायटीआय इंटरप्रायझेस व मे. सदन इंटरप्रायझेस या कचरा ठेकेदारांचे ५ कोटी ४६ लाख ५८७ रूपयांचे बील मिळण्यासाठी लेखा विभागाकडे बीलांच्या नस्त्या गेल्या. त्यावर आपल्या बोगस सह्या असल्याचा संशय लेखा विभागातील कर्मचाºयांना आला. त्याची खात्री करण्यासाठी सर्व नस्त्या आरोग्य विभागाच्या उपायुक्ता वंदना गुळवे यांच्याकडे आल्या असता त्यांनी बीलाच्या नस्त्यांवर बोगस सही असल्याची तक्रार आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे केली. त्यामुळे आयुक्त हिरे यांनी विधी विभागास सदर ठेकेदारांविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार काल गुरूवार रोजी वायटीआय इंटरप्रायझेस व मे. सदन इंटरप्रायझेस यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली असून अशा बोगस बीलांची छाननी करून चुकीच्या कामांना पाठीशी घालणाºया अधिकाºयां विरोधात देखील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या बाबत मनपा आयुक्त मनोहर हिरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वायटीआय इंटरप्रायझेस व मे. सदन इंटरप्रायझेस या दोन्ही कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांना भविष्यात कामे देण्यात येणार नाहीत,असे सांगीतले.

Web Title: In the case of Bhiwandi Municipal Corporation, a case has been registered against the accused in connection with the bogus case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.