डहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 11:36 PM2018-08-19T23:36:39+5:302018-08-19T23:40:39+5:30

आजूबाजूच्या बोटींवरील मच्छिमार मदतीला धावल्यानं अनर्थ टळला

Boat with 11 fisherman on board capsized at dahanu all rescued | डहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप

डहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप

googlenewsNext

डहाणू/बोर्डी: डहाणूच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या बोटीवरील 11 खलाशांचा जीव वाचला आहे. रात्री साडेआठच्या सुमारास ही बोट बुडाली. यावेळी आजूबाजूच्या बोटीवरील मच्छिमार मदतीसाठी धावून आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

धाकटी डहाणू येथील भानुदास गजानन तांडेल यांची भाग्यलक्ष्मी(IND-Mh-2293) ही बोट डहाणू बंदरातून 4 ऑगस्ट रोजी मासेमारीला गेली होती. आज रात्री साडेआठच्या सुमारास ती बुडाली. या वेळी बोटीवर तांडेल यांच्यासह 11 खलाशी होते. आजूबाजूच्या बोटी आणि त्यावरील मच्छीमार मदतीला धावून आल्यानं जीवितहानी टळली. डहाणू बंदरासमोर सुमारे 30 नॉटिकल खोल समुद्रात हा अपघात घडला. स्थानिक मच्छीमार बोटी या बुडालेल्या बोटीला आणि त्यावरील खलाशांनी घेऊन बंदराकडे येत असून सोमवारी पहाटेपर्यंत ते बंदरात परततील, अशी माहिती मिळते आहे.

Web Title: Boat with 11 fisherman on board capsized at dahanu all rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.