शेलगावमध्ये विहिरीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:24 AM2019-06-06T00:24:43+5:302019-06-06T00:24:48+5:30

सरकारी अहवालानुसार मुरबाड तालुक्यात ३८ गावे व ४१ वाड्यांत टंचाई आहे. शेलगावच्या वरच्या बाजूला पाझर तलाव आहे. मात्र, तोही कोरडा पडल्याने खाली असलेल्या विहिरीने तळ गाठला आहे.

The base reached by a well in Sheelgaon | शेलगावमध्ये विहिरीने गाठला तळ

शेलगावमध्ये विहिरीने गाठला तळ

Next

मुरबाड : तालुक्यात आजघडीला ३८ गावे व ४१ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून यात शेलगावची भर पडली आहे. गावाजवळ पाझर तलाव आहे. मात्र, तोही कोरडा पडला आहे. तर, जवळच असलेल्या विहिरीने तळ गाठला आहे. गावासाठी पाण्याचा स्रोत म्हणजे सार्वजनिक बोअरवेल. परंतु, ती चार दिवसांपासून नादुरुस्त झाली असल्याने शेलगावमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी बोअरवेल दुरु स्त करण्याची मागणी केली. मात्र, बोअरवेल दुरुस्त करणाऱ्या गाडीत डिझेल नसल्याने कर्मचाऱ्यांनी तुम्ही डिझेलची व्यवस्था करा, आम्ही गाडी घेऊन येतो, असे उत्तर ग्रामस्थांना दिले आहे.

सरकारी अहवालानुसार मुरबाड तालुक्यात ३८ गावे व ४१ वाड्यांत टंचाई आहे. शेलगावच्या वरच्या बाजूला पाझर तलाव आहे. मात्र, तोही कोरडा पडल्याने खाली असलेल्या विहिरीने तळ गाठला आहे. जवळपास एक हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला विहीर आणि बोअरवेल हाच काय तो पाण्याचा स्रोत. मात्र, विहीर आटली आणि बोअरवेल नादुरुस्त झाल्यामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे.

नादुरुस्त बोअरवेल दुरु स्त करावी म्हणून ग्रामस्थ अरुण सपाट यांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली. परंतु, सरकारी गाडीत डिझेल नाही. तुम्ही डिझेलची व्यवस्था करा. आम्ही गाडी घेऊन येतो आणि बोअरवेल दुरुस्त करतो, असे सांगण्यात आले. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

पैसे नसल्याचे केले मान्य
याबाबत पाणीपुरवठा खात्याच्या एका कर्मचाºयाने डिझेलसाठी पैसे नसल्याचे मान्य करून शेलगावची बोअरवेल मी स्वत: गाडीत डिझेल घालून दुरुस्त करून देतो, असे सांगितले. उपअभियंता एझरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही.
पाणी साठवण्यासाठी टाक्यांचे वाटप

शेणवा : शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. टंचाई दूर करण्यासाठी मनसेच्या वतीने भटपाडा, नडगाव (कातकरीवाडी), बाबरवाडी, ढाकणे, भेकरमाल, विंचूचीवाडी, कवट्याचीवाडी,भातसानगर येथे मोफत पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डी.के. म्हात्रे, ऊर्मिला तांबे, जिल्हा संघटक मदन (अण्णा) पाटील, शैलेश बिडवी, संतोष साळवी, बालाजी गुळवी, राजन शितोळे, भारत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: The base reached by a well in Sheelgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.