ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर समर कॅम्पमध्ये बालकलाकारांची धम्माल 'बालझुंबड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:25 AM2019-04-28T11:25:13+5:302019-04-28T11:27:46+5:30

अभिनय कट्ट्यावर 'शाळा बालकलाकारांची' या समर कॅम्पमध्ये बालकलाकारांनी बालझुंबड उडाली.

Balkhambad, the child artist of the summer camp in Thane, | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर समर कॅम्पमध्ये बालकलाकारांची धम्माल 'बालझुंबड'

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर समर कॅम्पमध्ये बालकलाकारांची धम्माल 'बालझुंबड'

Next
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर बालकलाकारांची धम्माल 'बालझुंबड'ठाण्यातील बालवीरांसाठी समर कॅम्पबौद्धिक खेळ किल्ल्यांची माहिती सादर

ठाणे : शाळा संपली सुट्टी पडली करायचं काय जायचं कुठं अभ्यास करून कंटाळा आला आता सुट्टीत धम्माल करायची तर कुठे ठाण्यातील बालवीरांसाठी एक धम्माल समर कॅम्प अभिनय कट्टा आयोजित 'शाळा बालकलाकारांची'. या शाळेत नाटक होत नृत्य होत बौद्धिक खेळ किल्ल्यांची माहिती पण हे सर्व धम्माल मस्ती सोबतच.अभिनय कट्टा ४२६ वर ह्याच शाळेतील धम्माल विध्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.

        मुलांमधील आत्मविश्वास वाढावा मराठी भाषेविषयी आवड वाढावी म्हणून जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित बालझुंबड कार्यक्रमात सर्व बालकलाकारांची आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता पाठांतर करून चाल लावून सादर केल्या. *शिवम जंबुकर याने 'चंद्रावरची शाळा'; संघम मोरे ह्याने 'करवंदाची जाळी',समर्थ चौलकर ह्याने 'अंकाचा खेळ',अजिंक्य ताजने ह्याने 'सांग सांग भोलानाथ',इंद्रायणी बेलवलकर हिने 'ससोबा',वेदश्री निंबाळकर हिने  'कोणाला काय हवे',अनुप्रिता महाजन हिने 'फुलपाखरू', खुशी धावडे हिने 'पाऊस आला आला';आदित्य भोईर ह्याने 'संगणक' आणि स्वास्तिका बेलवलकर हिने 'भारतमाता* ह्या कवितांचे सादरीकरण केले.तन्मय मोरे ह्याने सादर केलेली चिंटूची इंग्रजी भाषेतील गोष्ट प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेली. कार्यक्रमाच विशेष आकर्षण होत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला 'नाकावरच्या रागाला औषध काय' हा नृत्यभिनय* .कळत नकळत चित्रपटातील रुसलेल्या भाचीला मनवण्यासाठी तिच्या मामाने केलेल्या धम्माल गीताचे नृत्य सादरीकरण शाळा बालकलाकारांची च्या सर्व बालकलाकारांनी सादर केले. सादर सादरीकरणात *सुदाम मोरे,संघम मोरे,तन्मय मोरे,तनिषा जाधव,शिवम जंबुकर,समर्थ चौलकर,इंद्रायणी बेलवलकर,स्वस्तिका बेलवलकर,अनुप्रिता महाजन,वेदश्री निंबाळकर,अजिंक्य ताजने,आदित्य भोईर* ह्यांनी सहभाग घेतला.बालकलाकरांच्या ह्या नृत्यभिनयाने उपस्थित प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.कट्टा क्रमांक ४२६ वरील बालझुंबड कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या बालकलाकार  चिन्मय मौर्ये ह्याने केले. अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी प्रत्येक बालकलाकारांची खास ओळख उपस्थितांना करून दिली.लहान मुलांमधील प्रत्येक कलागुण जोपासना गरजेचं आहे. कला माणसाला जगायला शिकवते.मोबाईलच्या युगात पुस्तकांचं वाचन कमी झालाय आपली वाचनसंस्कृती आपण जपणे गरजेचं आहे. म्हणूनच कवितावाचनाचा कार्यक्रम जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता' असे मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले* .

Web Title: Balkhambad, the child artist of the summer camp in Thane,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.