आयएएस अधिकारी निधी चौधरींवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:40 AM2017-07-31T00:40:50+5:302017-07-31T00:40:50+5:30

प्रशिक्षणासाठी अंबरनाथ पालिकेत आलेल्या निधी चौधरी यांनी पालिकेच्या चार इमारती धोकादायक ठरवत कोणतीही निविदा प्रक्रिया पार न पाडता

ayaeesa-adhaikaarai-naidhai-caaudharainvara-gaunahaa | आयएएस अधिकारी निधी चौधरींवर गुन्हा

आयएएस अधिकारी निधी चौधरींवर गुन्हा

googlenewsNext

अंबरनाथ : प्रशिक्षणासाठी अंबरनाथ पालिकेत आलेल्या निधी चौधरी यांनी पालिकेच्या चार इमारती धोकादायक ठरवत कोणतीही निविदा प्रक्रिया पार न पाडता परस्पर तोडल्याचे प्रकरण अंगलट आले असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी तक्रार केली होती.
सध्या पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या निधी चौधरी २ मे ते १० जुन २०१४ या काळात अंबरनाथला मुख्याधिकारी पदावर असताना पालिकेच्या मालकीच्या भाजी मार्केटसमोरील परिचारिका इमारत, वडवली वेल्फेअर सेंटर, उलनचाळ वेल्फेअर सेंटर आणि मोरिवली येथील इमारती स्ट्रक्चरल आॅडिट न करता आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता तोडल्या. एवढेच नव्हे तर इमारत तोडण्यासाठी ठेकेदार नेमण्यासाठी निविदा न काढता परस्पर एका ठेकेदाराला काम देत त्या इमारतीच्या भंगाराच्या मोबदल्यात इमारत तोडून घेतली. त्यावर करंजुले शासनाकडे दाद मागितली. पण कारवाई न झाल्याने त्यांनी उल्हासनगर न्यायालयात याचिका दाखल केली. त्या प्रकरणातील हा निकाल आहे.

Web Title: ayaeesa-adhaikaarai-naidhai-caaudharainvara-gaunahaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.