अमृतकुंभ धरणामुळे होणार २०० गावपाड्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:44 AM2019-05-29T00:44:36+5:302019-05-29T00:44:42+5:30

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे

Amritkumbh dam will benefit from 200 villages | अमृतकुंभ धरणामुळे होणार २०० गावपाड्यांना लाभ

अमृतकुंभ धरणामुळे होणार २०० गावपाड्यांना लाभ

Next

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लावून धरली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे शहापूरकरांचे लक्ष लागून आहे.
या नियोजित धरणातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा झाल्यास शहापूर तालुक्यातील सुमारे २०० गावपाड्यांची पाणीटंचाईतून कायमची मुक्तता होईल, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे असतानाच, शहापूरच्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे २०० गाव-पाड्यांतील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे वास्तव चित्र आहे. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. याचे वास्तव शहापूरच्या गावखेड्यांना भेटी दिल्यानंतर डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या दौºयाप्रसंगी खर्र्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी त्र्यंबक डोंगरे, प्रकाश सांडे आणि भरत पांढरे यांनी या अमृतकुंभ जलसागर धरणाच्या प्रस्तावाकडे डावखरे यांचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून त्यांनी या धरणासाठी आता मुख्यमंत्र्याना साकडे घातले आहे.
शहापूर तालुक्याच्या उत्तरेकडील घाटनदेवी माता मंदिराच्या दक्षिण बाजूला आणि कसारा घाट रस्त्याच्या डावीकडील खोऱ्यांमधील पाच ते सात दºयांच्या परिसरात धरण बांधता येणार आहे.
प्रस्तावित धरणाचा परिसर शहापूर तालुक्याच्या २०० ते ५०० मीटर उंच भूभागावर असल्याने गुरु त्वाकर्षण पद्धतीने गावांना सहजपणे पाणीपुरवठा होईल. प्रस्तावित धरणाची जमीन वन विभागाच्या मालकीची असून, धरणाच्या परिसरात एकही गाव वसलेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही.
>साखरोली, मानिवली धरणातील गाळ उपसण्याची गरज
शहापूर तालुक्यातील साखरोली व मुरबाड तालुक्यातील मानिवली येथील धरणांमध्ये गाळ साचला असल्याचे निदर्शनास आले. गाळ काढण्याबरोबरच दोन्ही तलावांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास परिसराला चांगला पाणीसाठा होण्याबरोबरच विहिरी व विंधण विहीरींच्या पाणीपातळीतही वाढ होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर दोन्ही धरणातील गाळ काढण्यासह खोली तसेच रुंदीकरणासाठी डावखरे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले.
>टंचाईमुक्त होणारा परिसर : शहापूर तालुक्यातील खर्डी, वाशाळा, तलवाडा-डोळखांब, कसारा-मोखावणे, अजनूप, शिरोळ, वरस्कोळ, दहिगाव, पळशीण, आटगाव, भोसपाडा, आंबिवली, टेंभा, बेलवड, धामणी, जरंडी, गोलभण, दळखण, बिरवाडी, चांदे, कानविंदे, पेंढरघोळ, कळमगाव, पेंढरघोळ, किन्हवली आदी परिसराची प्रस्तावित धरण झाल्यास पाणीटंचाईतून मुक्तता होऊ शकेल.

Web Title: Amritkumbh dam will benefit from 200 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.