फरिदाला ओमानला पाठविणारा एजंट गेला कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:55 AM2018-05-28T06:55:21+5:302018-05-28T06:55:21+5:30

परिस्थितीने गांजलेल्या फरिदा नावाच्या महिलेला ओमानमधील एका शेखकडे नोकरीसाठी पाठवून तिच्या हालअपेष्टांसाठी कारणीभूत ठरलेल्या एजंट इम्रानला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

The agent who sent Farida to Oman went to jail | फरिदाला ओमानला पाठविणारा एजंट गेला कोठडीत

फरिदाला ओमानला पाठविणारा एजंट गेला कोठडीत

Next

अंबरनाथ -    परिस्थितीने गांजलेल्या फरिदा नावाच्या महिलेला ओमानमधील एका शेखकडे नोकरीसाठी पाठवून तिच्या हालअपेष्टांसाठी कारणीभूत ठरलेल्या एजंट इम्रानला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपल्यावर पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी त्याने सुटकेसाठी उकळलेले ४० हजार रूपयेही फरीदाला परत केले होते.
या एजंटविरोधात फरिदाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच महिला आयोगानेही त्या संदर्भात कारवाईचे निर्देश दिल्याने इम्रान अटक करण्यात आली.
अंबरनाथच्या पश्चिम भागातील बुवापाडा या झोपडपट्टीसदृश्य परिसरात फरिदा अब्दुल अजीज खान (३६) राहते. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तिने दुबईला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. एका एजंटमार्फत ती तेथे रवाना झाली. पण ती जेथे काम करत होती तेथे तिला मरणयातना सहन कराव्या लागल्या. दिवसाचे २० ते २३ तास कष्ट करूनही तिला सुकी रोटी खावी लागत होती. महिनाभर फरिदाने हे हाल सोसले आणि संधी मिळताच भारतात नवऱ्याशी संपर्क साधला आणि तेथील परिस्थिती सांगितली. आपल्या पत्नीसमोरील संकट दूर करून तिला पुन्हा भारतात आणण्यासाठी त्याने अंबरनाथच्या त्याच एजंटला गळ घातल्यावर त्याने तिच्या सुटकेसाठी ४० हजार रूपये उकळले. त्यानंतरही सुटकेसाठी काहीच हालचाल होत नसल्याने त्याने परराष्ट्र मंत्रालय आणि महिला आयोगाची मदत घेतली. त्यांच्या प्रयत्नांनंतर फरिदाची कशीबशी सुटका झाली. तरीदेखील फरिदाला दुबईच्या एजंटकडे दोन महिने रहावे लागले. त्यामुळे तीन महिने संकटाशी झुंज देत ती अखेर १ मे रोजी भारतात परतली.
तिची फसवणूक करणारा अंबरनाथ येथील एजंट इम्रान याला यापूर्वी पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पण भारतात परतल्यावर फरिदाने केलेली तक्रार, तिच्या हालअपेष्टांचे वर्णन आणि महिला आयोगाने दिलेल्या निर्देशामुळे अंबरनाथ पोलीस ठाण्यात इम्रानविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दुबईतील शेखच्या तावडीतून फरीदाची सुटका करायची असेल आणि तिला पुन्हा भारतात परत आणायचे असेल तर ४० रूपये द्यावे लागतील असे इम्रानने तिच्या नवºयाला सांगितले होते. त्याने जमवाजमव करून पैसे दिले, तरीही तिची सुटका झाली नव्हती.

Web Title: The agent who sent Farida to Oman went to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.