पालघर मधील ऍरो मॉडेलिंगमध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:57 PM2018-12-10T22:57:42+5:302018-12-10T23:10:56+5:30

रोटरी क्लबने पालघर मध्ये आयोजित ऍरो मॉडेलिंग शो मध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर ह्या विमानाच्या प्रतिकृती असलेल्या विमानांच्या हवेतील चित्तथरारक कवायती पाहून उपस्थित हजारो विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

In Aerospace Modeling in Palghar, Sukhoi-30, Tejas, Phoenix Glider | पालघर मधील ऍरो मॉडेलिंगमध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर

पालघर मधील ऍरो मॉडेलिंगमध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर

Next

पालघर : रोटरी क्लबने पालघर मध्ये आयोजित ऍरो मॉडेलिंग शो मध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर ह्या विमानाच्या प्रतिकृती असलेल्या विमानांच्या हवेतील चित्तथरारक कवायती पाहून उपस्थित हजारो विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

पालघरच्या आर्यन हायस्कुलच्या मैदानावर रोटरी क्लब ऑफ पालघर च्या वतीने शनिवारी एरो मॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले होते. बोईसरचे उद्योजक नितीन अगरवाल यांच्या हस्ते या कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, रोटरी अध्यक्ष मयूर काशीकर, कार्यक्र म प्रमुख भगवान पाटील, अरुण पाटील, दीपेश ठाकूर, प्रशांत पाटील, जयेश आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील आर्यन हायकुल, आदर्श विद्यामंदिर केळवे, जीवन विकास, जिप नवली, यमुना यशवंत हायस्कुल शिरगाव आदी १६ ते १७ शाळेतील हजारो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आपला सहभाग नोंदवला होता. विमानाचे उडणे हे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांमध्ये एक कुतूहल आणि आश्चर्य समजले जात असताना शेकडो टनाचे विमान हवेत कसे तरंगते? धावपट्टीवर कसे उतरते? अशा विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंकांचे निरसन या कार्यक्रमातुन करण्यात आले.

सातारा येथील सदानंद काळे यांनी सुखोई, तबकडी, तेजस, सेसना, स्काय मास्टर, फोनिक्स ग्लायडर आदी १२ विमानांच्या प्रतिकृती मैदानात ठेवून त्यांचा पुत्र अथर्व काळे यांनी आपल्या जवळील रेडिओ कंट्रोल रिमोट च्या सहाय्याने ही सर्व विमाने हवेत उडवून दाखिवली. सुखोई विमानाच्या कसरती, हवेतला पाठलाग, आकाशातील पुष्पवृष्टी, आदी चित्तथरारक कवायतीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
विमानाचे तंत्रज्ञान ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात यायला हवे असे सांगून कार्यानुभव (क्राफ्ट) च्या शिक्षकांनी विमानाची प्रतिकृती बनविण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिल्यावर त्यातील तंत्रज्ञानाची माहिती विज्ञानाच्या शिक्षकांनी दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होऊन देशाला चांगले पायलट व इंजिनिअर मिळू शकतात असा आशावाद काळे यांनी लोकमत कडे व्यक्त केला.

Web Title: In Aerospace Modeling in Palghar, Sukhoi-30, Tejas, Phoenix Glider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.