जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:09 PM2018-12-08T18:09:53+5:302018-12-08T18:12:12+5:30

जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल. या शिक्षकाना जिल्ह्या बाहेर सेवा देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. आता त्यांची उर्वरित सेवा अन्य जिल्ह्यातच पूर्ण होणार आहे. काही शिक्षकांचे महापालिकांमधील शाळेत तर काहींची सेवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पूर्ण होणार आहे. महापालिकांमध्ये कार्यरत होणाऱ्या शिक्षकांचा मात्र फायदाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

Adjustment of additional teachers in the district now in any district of the state, with Konkan | जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

समायोजन आता कोकणातील जिल्ह्यांत अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागे केले जाणार

googlenewsNext
ठळक मुद्देकेवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्हह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले पण उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले


ठाणे : विद्यार्थी संख्ये अभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसन दिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील १५६ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढत असताना केवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्हह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले. पण उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यांचे समायोजन आता कोकणातील जिल्ह्यांत अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागे केले जाणार आहे.
विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीन दिवसांपूर्वी कोपरी येथील मंगला हायस्कूलमध्ये कॅम्प घेण्यात आला. त्यावेळी
जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल.
या शिक्षकाना जिल्ह्या बाहेर सेवा देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. आता त्यांची उर्वरित सेवा अन्य जिल्ह्यातच पूर्ण होणार आहे. काही शिक्षकांचे महापालिकांमधील शाळेत तर काहींची सेवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पूर्ण होणार आहे. महापालिकांमध्ये कार्यरत होणाऱ्या शिक्षकांचा मात्र फायदाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दाखल होणाºयां शिक्षकांची अतिरिक्त ठरण्याची समस्या कायमची सुटणार असल्याचे बोलले जात आहे. कोकण विभागातील शाळांमध्येही या कर्मचाºयांना सामावून घेण्याचा प्रश्न उद्भवल्यास त्यांना राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागी सामावून घेण्याचे शासन धोरण जारी करण्यात आले आहे.

Web Title: Adjustment of additional teachers in the district now in any district of the state, with Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.