गैरवर्तनप्रकरणी शिक्षकावर गुन्हा , नगरसेवकाच्या पुढाकारानंतर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:22 AM2018-02-24T00:22:45+5:302018-02-24T00:22:45+5:30

विद्यार्थिंनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली शिक्षक रघुनाथ हरड याच्यावर अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला.

Action on abusive teacher, action taken after corporator's initiative | गैरवर्तनप्रकरणी शिक्षकावर गुन्हा , नगरसेवकाच्या पुढाकारानंतर कारवाई

गैरवर्तनप्रकरणी शिक्षकावर गुन्हा , नगरसेवकाच्या पुढाकारानंतर कारवाई

Next

डोंबिवली : विद्यार्थिंनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली शिक्षक रघुनाथ हरड याच्यावर अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला. हा प्रकार अनेक दिवसांपूर्वी उघड होऊनही शाळेने, संस्थाचालकांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांना घटना समजताच त्यांच्या पुढाकाराने तक्रार दाखल झाली.
दावडी परिसरातील आर. टी. पी. मराठी विद्यालयात ८ फेब्रुवारीला दुसरी ते सहावीपर्यंतच्या मुलांसाठी सुरक्षित-असुरक्षित स्पर्श या विषयावर सामाजिक संस्थेने चित्रफीत दाखविली. ती पाहताना सहावीतील मुली रडू लागल्या. त्यांच्याशी केलेल्या चर्चेत शिक्षक रघुनाथ हरड याने असुरक्षित स्पर्श केल्याचे समोर आले. मुख्याध्यापकांना तपशील दिल्यावर त्याला निलंबित केले, पण हा प्रकार पोलिसांपासून लपवल्याचा पालकांचा आरोप आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ : यासंदर्भात माहिती देण्यास मानपाडा पोलिसांनी टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पत्रकारांनी पोलीस ठाण्यात असलेल्या ठाणे अंमलदाराला विचारणा केली असता गुन्हा दाखल आहे, परंतु गुन्हा दाखल करणाºया महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव याच तुम्हाला माहिती देतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. जाधव यांना विचारणा केली असता त्यांनीही गुन्हा दाखल असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला. तुम्ही वरिष्ठांना भेटा आणि मगच माहिती देते असे त्यांनी सुनावत टाळाटाळ केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल्ले हे त्यांच्या कक्षात बैठकीत व्यस्त होते. बराच वेळ होऊनही बैठक संपत नसल्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावेळी ठाणे अंमलदारांकडून कल्याण नियंत्रण कक्षातून माहिती घ्या, असेही सांगण्यात आले. कल्याण नियंत्रण कक्षाशी संपर्क केल्यावर मानपाडा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा आलेला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: Action on abusive teacher, action taken after corporator's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.