एसीपी निपुंगेंना होणार कोणत्याही क्षणी अटक, महिला पोलिस आत्महत्या प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:55 PM2017-09-22T22:55:02+5:302017-09-22T22:55:19+5:30

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झालेल्या सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते.

ACP detained at any time for Nippunga, women's police suicide case | एसीपी निपुंगेंना होणार कोणत्याही क्षणी अटक, महिला पोलिस आत्महत्या प्रकरण

एसीपी निपुंगेंना होणार कोणत्याही क्षणी अटक, महिला पोलिस आत्महत्या प्रकरण

Next

 - जितेंद्र कालेकर 
ठाणे, दि. २२ - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झालेल्या सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही ते स्वत:हून आयुक्तालयात हजर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.
निपुंगे यांनी आपल्या कनिष्ठ महिला कर्मचारी सुभद्रा हिच्याबरोबर तब्बल ११० वेळा फोनवरून संपर्क साधल्याची बाब गुरुवारी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. याच कारणास्तव त्यांचा मोबाइल जप्त करण्याची परवानगीही पोलिसांनी मागितली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मुळात, निपुंगे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असल्याने सोमवारच्या सुनावणीपूर्वीदेखील त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. या वृत्ताला तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे सोमवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला, तरच त्यांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्यांनी चौकशी अधिकारी किंवा मुख्यालयाचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे संपर्क साधलेला नाही. त्यामुळे विनापरवानगी गेल्या १५ दिवसांपासून गैरहजर राहिलेल्या निपुंगे याच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा अहवालही तपास अधिका-यांकडून पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तसेच राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्या अहवालावरही येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अटक आणि दुसरीकडे प्रशासकीय कारवाई, अशा दोन्ही बाजूंची टांगती तलवार निपुंगे यांच्यावर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

........................................

 

 

 

 

- जितेंद्र कालेकर 
ठाणे, दि. २२ -ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झालेल्या सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही ते स्वत:हून आयुक्तालयात हजर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.
निपुंगे यांनी आपल्या कनिष्ठ महिला कर्मचारी सुभद्रा हिच्याबरोबर तब्बल ११० वेळा फोनवरून संपर्क साधल्याची बाब गुरुवारी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. याच कारणास्तव त्यांचा मोबाइल जप्त करण्याची परवानगीही पोलिसांनी मागितली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मुळात, निपुंगे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असल्याने सोमवारच्या सुनावणीपूर्वीदेखील त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. या वृत्ताला तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे सोमवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला, तरच त्यांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्यांनी चौकशी अधिकारी किंवा मुख्यालयाचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे संपर्क साधलेला नाही. त्यामुळे विनापरवानगी गेल्या १५ दिवसांपासून गैरहजर राहिलेल्या निपुंगे याच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा अहवालही तपास अधिकाºयांकडून पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तसेच राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्या अहवालावरही येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अटक आणि दुसरीकडे प्रशासकीय कारवाई, अशा दोन्ही बाजूंची टांगती तलवार निपुंगे यांच्यावर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. 

 

 

Web Title: ACP detained at any time for Nippunga, women's police suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.