अ‍ॅमेझॉन कंपनीच्या कर्मचा-यांकडून चोरीचे ५७ मोबाईल पोलीसांनी केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:31 AM2018-02-13T00:31:57+5:302018-02-13T00:34:58+5:30

57 mobile police stolen from Amazon company employees | अ‍ॅमेझॉन कंपनीच्या कर्मचा-यांकडून चोरीचे ५७ मोबाईल पोलीसांनी केले जप्त

अ‍ॅमेझॉन कंपनीच्या कर्मचा-यांकडून चोरीचे ५७ मोबाईल पोलीसांनी केले जप्त

googlenewsNext
ठळक मुद्दे डिलेव्हरी डॉट कॉम कंपनीकडून अ‍ॅमेझॉन कंपनीचे २६७ मोबाईल चोरीस गेल्याची तक्रारअ‍ॅमेझॉन कंपनीचा माल चोरीत डिलेव्हरी डॉट कॉम व अ‍ॅमेझॉन कंपनीतील कर्मचारी सामिलशहरातील वंजारपाटी नाका येथे चौकडीकडून ५७ मोबाईल व ३ लॅपटॉप जप्त

भिवंडी : डिलेव्हरी डॉट कॉम या कुरीयर कंपनीकडून अ‍ॅमेझॉन कंपनीस परत दिलेल्या मालातील २६७ मोबाईल परस्पर चोरीस गेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यास शहरात आलेल्या चौकडीकडून भिवंडीच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ५७ मोबाईल व ३ लॅपटॉप जप्त केले आहेत. या चौकडीत अ‍ॅमेझोन कंपनीच्या कर्मचा-यांचा समावेश आहे.
तालुक्यातील माणकोली नाका येथे इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदाममध्ये डिलेव्हरी डॉट कॉम या कुरीयर कंपनीचे कार्यालय आहे.अ‍ॅमेझोन कंपनीच्या आॅनलाईनवरून ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू डिलेव्हरी डॉट कॉम कंपनी मार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जात होत्या.परंतू ग्राहकांनी वस्तू स्विकारण्यास नकार दिल्यास अथवा ग्राहकाचा पत्ता न सापडल्यास सदरच्या वस्तू डिलेव्हरी डॉट कॉम ही कुरीयर कंपनी पुन्हा माघारी अमेझॉन कंपनी कडे पाठवीत होती. परंतु मागील चार महिन्यात अमेझॉन कंपनीस मिळणा-या वस्तूंची गोळाबेरीज जमत नसल्याने त्यांनी डिलेव्हरी डॉट कॉम कंपनी कडे तक्रार केली. त्यानुसार कुरीयर कंपनीचे सुरक्षा अधिकारी मंगेश मोहिते यांनी नारपोली पोलीस स्टेशनमध्ये २४ लाख रु पयांचे २६७ मोबाईल परस्पर अपहार झाल्याची तक्रार नोंदविली.
दरम्यान डिलेव्हरी डॉट कॉम मधील कर्मचारी उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन तसेच अमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ व सचिन पटाळे हे आपल्याकडील महागडे मोबाईल शहरातील वंजारपाटीनाका येथे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली. त्यांनी वंजारपाटीनाका येथे सापळा रचून चौकडीच्या मुसक्या आवळल्या.त्यामधून अ‍ॅमेझोन कंपनीच्या चोरीस जाणा-या वस्तूंचा धक्कादायक प्रकार समोर आला.
अ‍ॅमेझोन कंपनीच्या ज्या किमती वस्तू डिलेव्हरी डॉट कॉम कुरियर कंपनीकडे माघारी येत होत्या त्या वस्तू कंपनीचा कर्मचारी उमेश गुळवी हा अमेझॉन कंपनीकडे परत पाठवित होता. त्या दरम्यान गुळवी हा या वस्तूंच्या कार्टून वरील सील ड्रायव्हरच्या मदतीने बाहेर काढून त्यामधील किमती मोबाईल , लॅपटॉप हे परस्पर बाजूला काढून रिकामे बॉक्स कार्टून मध्ये ठेवून ते कार्टून अमेझॉन कंपनीस पाठवित होता. तसेच या टोळीत सामील असलेले अ‍ॅमेझोन कंपनीतील कर्मचारी संदीप सराफ व सचिन पटाळे हे कार्टूनमधील मालाची कोणतीही शहनीशा न करता कार्टून ताब्यात घेण्याचे काम नियमीत करीत होते. आॅक्टोबर २०१७ पासून हि टोळी अशा पद्धतीने काम करीत असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने वंजारपाटी नाका येथे पकडलेल्या चौकडीकडून ५७ मोबाईल व ३ लॅपटॉप असा पंधरा लाख रूपयांचा माल जप्त केला आहे.सोमवारी भिवंडी न्यायालयात त्यांना हजर केले असता शनिवार १७ फेब्रुवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या टोळीत सामिल असलेले कर्मचारी चोरीच्या मालासह पकडले जातील,अशी माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे . विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉन कंपनीच्या व्यवस्थापकाने या घटनेबाबत कोणतीही तक्रार नोंदविली नाही,या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: 57 mobile police stolen from Amazon company employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.