‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’संदेश देणारी ५० किलो मिठाची रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:36 AM2018-11-07T03:36:09+5:302018-11-07T03:36:27+5:30

दिवाळी या लखलखीत प्रकाशाचा सण आहे. प्रकाश दिव्यांसह या सणाला रांगोळीचे आगळेवेगळे महत्त्व आहे.

 50 kg of silvery rangoli for 'Sankalp Healthy Maharashtra' message | ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’संदेश देणारी ५० किलो मिठाची रांगोळी

‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’संदेश देणारी ५० किलो मिठाची रांगोळी

googlenewsNext

- सुरेश लोखंडे
ठाणे  - दिवाळी या लखलखीत प्रकाशाचा सण आहे. प्रकाश दिव्यांसह या सणाला रांगोळीचे आगळेवेगळे महत्त्व आहे. याचेऔचित्य साधून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग संचालयनाच्या मुख्यालय प्रवेशव्दारावर ५० किलो मिठाचा वापर करून ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ हा लोगो आकर्षक रांगोळी काढून बघ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कल्याण येथील शिवाजी चौगुले या तरुणाने ही आकर्षक रांगोळी काढून राज्यातील निरोगी आणि आनंदी कुटुंबाचा संदेश दिला आहे.
दिवाळीत गोडधोड पदार्थांसह दिव्यांची आरास आणि घरांच्या अंगणांसह सार्वजनिक ठिकाणी काढलेल्या रांगोळ्या, त्यावर होणाऱ्या फटाक्यांची आताषबाजी ‘दिवाळी’ या प्रकाशाच्या तेजोमय सणाची शोभा वाढवतात. लखलखणाºया दिव्यांची आरास वेगवेगळे रंग भरून काढलेल्या रांगोळ्या आकर्षण अधिक दृढ करतात. दिवाळीच्या या योग्य कालावधीचे महत्त्व लक्षात घेऊन आरोग्य खात्यानेनिरोगी राहण्याचा संदेशाची जनजागृती या रांगोळीव्दारे करून कुटूंब आनंदी ठेवण्याचा संदेश रूजवला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचाºयांनीही ही रांगोळी पाहून चौगुले यांचे कौतुक केले.
संकल्प आरोग्य महाराष्ट्राचा हा संदेश देणाºया रांगोळीसाठी ५० किलो पांढरे जाड मीठ आणि पाच किलो रंग वापरून हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा लोगो तयार केला. कल्याणच्या चिंचपाडा येथील साई सहारा अपार्टमेंट येथील रहिवाशी आणि आरोग्य सेवा संचालनालयात शिपाईपदी कार्यरत असलेले चौगुले यांनी तब्बल सहा तासाच्या अवधीत ही मिठाची रांगोळी साकारली आहे.
चौगुले यांनी या आधी प्रजासत्तक दिन, स्त्रीभ्रूण हत्या, लेक वाचवा, आदी संदेश देणाºया मिठाच्या रांगोळ्या काढल्या आहेत.

Web Title:  50 kg of silvery rangoli for 'Sankalp Healthy Maharashtra' message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे