३५ गणेश मंडळांचा प्रचंड दणदणाट, ठाणे पोलिसांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:31 AM2018-09-26T04:31:21+5:302018-09-26T04:31:37+5:30

बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाची तीव्रता चढविणाऱ्या ठाणे शहर आयुक्तालयातील तब्बल ३५ गणेश मंडळांविरोधात प्रस्ताव तयार करून पोलिसांनी ते प्रस्ताव

35 Ganesh Mandal's tremendous weightlifting, Thane police claims | ३५ गणेश मंडळांचा प्रचंड दणदणाट, ठाणे पोलिसांचा दावा

३५ गणेश मंडळांचा प्रचंड दणदणाट, ठाणे पोलिसांचा दावा

Next

ठाणे  - बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाची तीव्रता चढविणाऱ्या ठाणे शहर आयुक्तालयातील तब्बल ३५ गणेश मंडळांविरोधात प्रस्ताव तयार करून पोलिसांनी ते प्रस्ताव एमपीसीबी अर्थात महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडेमंगळवारी धाडले. यामध्ये सार्वधिक उल्हासनगर परिमंडळातील तब्बल २० मंडळांचा समावेश आहे. तर दुसरीक डे भिवंडी परिमंडळातील एकाही मंडळाविरोधात प्रस्ताव नसल्याचे दिसते. ज्या मंडळानी ९० ते १०० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची पातळी ओलांडली त्यांच्याविरोधात प्रस्ताव तयार केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदा न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीप्रदूषणाबाबत गुन्हे दाखल करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किंवा महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांवर सोपवली आहे. त्यामुळे पूर्वी गुन्हा दाखल करण्यासाठी लागणारा ६० दिवसांचा कलावधी यामुळे कमी झाला आहे.तर स्थानिक पोलिसांना मोठमोठ्याने आवाज करणाºया मंडळांच्या मिरवणुकीतील ध्वनीप्रदूषणाबाबत रिडींग घेण्यास सांगितले. तसेच दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल पेक्षा जास्त आवाजाची तीव्रता केल्यास त्याच्या तीन कॉपी काढून संबंधित मंडळाच्या जबाबदार व्यक्तीला एक कॉपी देऊन पंचनामा करून जबाबही नोंदवावेत. जर ते शांतता क्षेत्र असल्यास तेथील नागरिकांचे जबाब घ्यावेत.
तसेच डीजे यासारखे संबंधित मुद्देमाल जप्त करावा, पंचनामा करताना जप्त मुद्देमालाची पावती तेथेच द्यावी,असे आदेश आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांनी गोपाळकालाप्रमाणे गणेशोत्सवातही चालढकलपणा केल्याचे समोर आले आहे.
कारण विसर्जनाला चोवीस तास झाल्यानंतर मंगळवारी ३५ मंडळांविरोधात ध्वनीप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वेय गुन्हे दाखल करण्याबाबत प्रस्ताव पोलिसांकडून महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे सादर केले आहेत.

आव्हाडांच्या मंडळाविरोधात प्रस्ताव

प्रमुख सल्लागार असलेले माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शहरातील नरवीर तानाजी सार्वजनिक मंडळासह हिंदू जनजागृती मित्र मंडळ, चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ आणि हरी भोले मित्रमंडळ या मंडळाविरोधात प्रस्ताव नौपाडा पोलिसांद्वारे तयार करण्यात आला आहे. उर्वरित परिमंडळातील गणेश मंडळांबाबत प्रस्ताव तयार केलेल्या मंडळांची नावे समजू शकलेली नाहीत.

४३ मंडळांना नोटिसा
महाराष्टÑ पोलीस कायद्यान्वये ४३ गणेश मंडळांना आवाज वाढवून ध्ननिप्रदूषण करू नये, याबाबत नोटिसा बजाविल्या असून यात सर्वाधिक ठाणे शहर परिमंडळातील २१ मंडळांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विनापरवानगी मिरवणूक काढल्याने गुन्हा

डोंबिवली : अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवशी, सोमवारी परवानगी न घेता विसर्जन मिरवणूक काढल्याबद्दल श्री साईनाथ मित्रमंडळाच्या पदाधिकाºयांविरूद्ध विष्णूनगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पश्चिमेतील जाधववाडी येथे श्री साईनाथ मित्रमंडळाने जाधववाडीच्या महाराजाच्या मूर्तीची स्थापना केली होती.
डीजेवरील बंदीच्या निषेधार्थ गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. मात्र, मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी समजावल्यानंतर सोमवारी विसर्जन करण्यात आले. मात्र, विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाने पोलिसांची परवानगी घेतली नव्हती.
मिरवणुकीसाठी ट्रकवर रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांची आतशबाजी करत वाहतुकीस अडथळाही निर्माण केला. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव, महेश जाधव, गणेश जाधव आणि इतर पदाधिकाºयांसह २० ते २५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: 35 Ganesh Mandal's tremendous weightlifting, Thane police claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.