भाजपाकडून दुसºया दिवशीही बसचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:47 AM2017-07-26T00:47:29+5:302017-07-26T00:47:52+5:30

2nd day BJP Welcome bus | भाजपाकडून दुसºया दिवशीही बसचे स्वागत

भाजपाकडून दुसºया दिवशीही बसचे स्वागत

Next

कल्याण : रेल्वे समांतर रस्त्यावरून सोमवारपासून सुरू झालेल्या कल्याण-डोंबिवली बसचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने फलकबाजी केली. त्यात केडीएमसीचेच प्लास्टिक मुक्तीचे आवाहन करणारे फलकही झाकोळले गेले. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच तो फलक तत्काळ हटवण्यात आला. दरम्यान, सोमवारी भाजपाच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनी बसचे स्वागत केल्यानंतर मंगळवारीही भाजपाच्या अन्य नगरसेवकांनी स्वतंत्रपणे स्वगात केले. मात्र, बस उशिराने आल्याने त्यांनी सभापती संजय पावशे यांच्याकडे नाराजीही व्यक्त केली.
सोमवारपासून समांतर रस्त्यावरून केडीएमटीच्या बस धावू लागल्या. शिवसेनेचे परिवहन सदस्य मनोज चौधरी आणि भाजपाच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्यात मात्र बस सुरू करण्यावरून श्रेयवाद चांगलाच रंगला आहे. त्याची प्रचिती जागोजागी लागलेल्या फलकबाजीतून आली. दरम्यान, मनोज चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या फलकामुळे तर कचोरी टेकडी येथे लावलेले प्लास्टीक मुक्तीचे होर्डिंग्जही झाकले गेल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाले. याची तत्काळ दखल घेत तो फलक तेथून हटवण्यात आला. त्यामुळे प्लास्टिक मुक्ती आवाहनाचा होर्डिंग्ज पुन्हा दिसू लागला.
प्रतीक्षा, स्वागत आणि सभापतींना टोला
सोमवारपासून बसला या मार्गावरून चालवण्यास प्रारंभ झाला असलातरी काही दिवस फारशा फेºया येथून होणार नसल्याचे उपक्रमाने स्पष्ट केले आहे. ज्या रिकाम्या बस आगाराकडे जातात, त्याच सुरुवातीला या मार्गावरून चालवण्यात येतील. वाढत्या प्रतिसादावर फेºया वाढवण्यात येतील, असे स्पष्टीकरण आले.
दरम्यान, सोमवारी भाजपाच्या नगरसेविका चौधरी यांनी बसचे स्वागत केले असताना मंगळवारीही मार्गावरून धावणाºया बसचे भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी स्वतंत्रपणे स्वागत केले. सकाळी ११.२५ ला ‘बालाजी आंगण’ संकुल येथे येणाºया बसचे स्वागत करण्यासाठी नगरसेवक साई शेलार, निलेश म्हात्रे, विनोद काळण, राजन आभाळे तसेच भाजपाचे परिवहन समिती सदस्य प्रसाद माळी, शशिकांत कांबळे हे वाट पाहत उभे होते. मात्र ही बस न आल्याने त्यांनी शिवसेनेचे सभापती संजय पावशे यांना मोबाइल करून नाराजी व्यक्त केली. परंतु, तब्बल दोन तास उशिराने दाखल बस दाखल झाली खरी पण ती घेऊन येण्याची नामुष्की सभापती पावशेंवर ओढावली. स्वागतासाठी परिवहन सभापती रिकामी बस घेऊन आले, असा टोला लगावत उपस्थित नगरसेवकांनी बसचे स्वागत केलेच तसेच पुष्पगुच्छ देऊन सभापतींचेही उपरोधिकपणे आभार मानले. बसचे स्वागत करण्यात येणार आहे, याची कल्पना अगोदरच दिली असती तर पहिलेच नियोजन केले असते, अशी प्रतिक्रिया पावशे यांनी त्यांना दिली.

Web Title: 2nd day BJP Welcome bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.