ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर २२ टक्के पाणी कपातीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 06:53 PM2018-10-22T18:53:25+5:302018-10-22T19:03:47+5:30

बारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणी कपातीचा सक्तीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला.

 22% water cut begins in Kalyan, Dombivli, Ulhasnagar, Bhiwandi, Mira Bhairinder, Ambernath and Kulgaon in Thane district. | ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर २२ टक्के पाणी कपातीला सुरूवात

पाणी पुरवठ्यातून २२ टक्के पाणी कपात आठवड्याभरात करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला

googlenewsNext
ठळक मुद्देबारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणा-या आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणा-या पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूटएमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींव्दारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणी पुरवठापाणी पुरवठ्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणी बचत

ठाणे : ठाणेच्या मुंब्रा - कळवा या भागासह जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून २२ टक्के पाणी कपात आठवड्याभरात करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यामुळे आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठिकठिकाणी होणारा पाणी पुरवठा एक दिवसपूर्ण बंद ठेवण्याची सक्ती आता लागू झाली आहे.
बारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणा-या आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणा-या पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणी कपातीचा सक्तीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींव्दारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणी पुरवठा होतो. या पाणी पुरवठ्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणी बचत करायची आहे. यामुळे महापालिकांनी एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून ही सक्तीची पाणी कपात लागू झाली आहे. यानुसार बारवी धरणासह उल्हासनदीतून पाणी उचलणा-या एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणी पुरवठा आता शुक्रवारी या एक दिवसा करीता बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यामुळे एमआयडीसीकडून सुमारे ५८३ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे.
याप्रमाणेच कल्याण - डोंबिवलीचा २३४ एलएलडी पाणी पुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर स्टेमव्दारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणी पुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. यामुळे स्टेमव्दारे करण्यात येणारा पाणी पुरवठा ठाणेच्या घोडबंदरसह शहरातील काही भागांसह भिवंडी मनपासह मीरा भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील गावखे्यांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. याशिवाय अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणी पुरवठा करणारे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ९० एमएलडी पाणी बचत एमजेपीकडून बचत होणार आहे. या पाणी कपातीमुळे बचत होणारे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.
जिल्ह्यात सक्तीने लागू केलेली २२ टक्के पाणी कपात आगामी दिवाळी, ईद आदी सणासुदीच्या काळात मात्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे सणातिवाराच्या कालावधीत मात्र मनसोक्त नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. धरणातील पाण्यातील तूट लक्षात घेऊन गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधी ही सक्तीची पाणी कपात लागू करावी लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून १४ टक्के कपात लागू केली होती . मात्र फेब्रुवारी , मार्चला ती ७ टक्के केली होती. त्यानंतर ती रद्द केली होती. पण आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघूपाटबंधारे विभागाने सक्तीचे २२ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकांसह एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदींना तो सक्तीने पाळावा लागणार आहे.

Web Title:  22% water cut begins in Kalyan, Dombivli, Ulhasnagar, Bhiwandi, Mira Bhairinder, Ambernath and Kulgaon in Thane district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.