ठाणे लोकसभा मतदारसंघात २०२ मतदान केंद्र क्रिटीकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 08:11 PM2019-04-24T20:11:21+5:302019-04-24T20:21:34+5:30

ठाणे जिल्हह्याच्या तिन्ही लोकसभा मतदारसंघात २०१४ ला केवळ ६४२ मतदान केंद्रे क्रिटीकल म्हणून घोषीत करण्यात आली होती. यंदाच्या या निवडणुकीला फक्त ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात २०२ क्रिटीकल मतदान केंद्रे घोषीत झाली आहे. यामुळे उर्वरित दोन मतदारसंघात क्रिटील मतदान केंद्रांची संख्या मोठ्याप्रमाणात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

202 polling centers in the Thane Lok Sabha constituency Critical! | ठाणे लोकसभा मतदारसंघात २०२ मतदान केंद्र क्रिटीकल!

ठाणे लोकसभा मतदार संघाच्या दोन हजार ४५२ मतदान केंद्रांपैकी २०२ केंद्र क्रिटीकल

Next
ठळक मुद्देगेल्या निवडणुकीत ९० टक्के मतदान झालेले७५ टक्के मतदान एकाच उमेदवारास मिळालेला निकष विचारातमतदान केंद्रात जास्तीत जास्त मतदारांकडे फोटो नसलेले मतदार ओळखपत्र

ठाणे : पोलिस यंत्रणेसह निरिक्षकनिवडणूक यंत्रणांनी ठाणे लोकसभा मतदार संघाच्या दोन हजार ४५२ मतदान केंद्रांपैकी २०२ केंद्र क्रिटीकल म्हणून घोषीत केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी निदर्शनात आणून दिले आहे. यामुळे या मतदार केंद्रांसाठी जादा पोलीस बळासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ), मतदान केंद्रांचे लाईव प्रक्षेपण, मतदारांचे छायाचित्रीकरण, इन कॅमेरा मतदान आदींची खास उपाययोजना केली जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सेंटर मॅजिस्टक आणि पोलिस यांच्यातील एकमताने ठाणे लोकसभेच्या क्रिटीकल मतदान केंद्रांची निवड करण्यात आली. या क्रिटीकल मतदान केद्रांसाठी विविध निकष लावण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मतदान केंद्रावर गेल्या निवडणुकीत ९० टक्के मतदान झालेले असावे, यातील ७५ टक्के मतदान एकाच उमेदवारास मिळालेला निकष विचारात घेतला आहे. याप्रमाणेच मतदान केंद्रात जास्तीत जास्त मतदारांकडे फोटो नसलेले मतदार ओळखपत्र असणे, एकाच परिवारातील मतदार एकत्र येण्याऐवजी एकएक करून (सिंगल ओटर) मतदान केलेल्या मतदारांची संख्या जास्त असणे, रेसिडेंसिएल मतदार जास्तीत जास्त असणे इत्यादी निकषांवर हे क्रिटीकल मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
ठाणे जिल्हह्याच्या तिन्ही लोकसभा मतदारसंघात २०१४ ला केवळ ६४२ मतदान केंद्रे क्रिटीकल म्हणून घोषीत करण्यात आली होती. यंदाच्या या निवडणुकीला फक्त ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात २०२ क्रिटीकल मतदान केंद्रे घोषीत झाली आहे. यामुळे उर्वरित दोन मतदारसंघात क्रिटील मतदान केंद्रांची संख्या मोठ्याप्रमाणात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये हे २०२ मतदान केंद्रे ११६ ठिकाणी आहेत. यामध्ये मीरा भार्इंदर विधानसभा मतदार संघात ३४ मतदान केंद्रे क्रिटीकल आहेत. याप्रमाणेच ओवळा माजीवडा विधानसभेतील ३५ मतदान केंद्रे, कोपरी पाचपाखाडी विधानसभेत ३० केंद्रे, ठाणे विधानसभेत २७ केंद्रे, ऐरोलीत ३७ आणि बेलापूरमध्ये ३९ मतदान केंद्रे क्रिटीकल म्हणून घोषीत केली आहेत. यामुळे या मतदान केंद्रांवर एसआरपीएफच्या जवानांसह कडक पोलीस बंदोबस्त, इन कॅमेरा मतदारासह छायाचित्रीकरण आणि मतदान केंद्रांमधील प्रत्येक हालचालीवर लाईव प्रक्षेपण निवडणूक आयोगाकडे होणार आहे.

Web Title: 202 polling centers in the Thane Lok Sabha constituency Critical!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.