१८ गावपाडे अजूनही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:41 AM2018-10-13T01:41:41+5:302018-10-13T01:42:49+5:30

आज अनेक गावपाड्यांत वीज पोहोचली असली, तरी अनेक पाडे असे आहेत की, त्यांना अद्याप वीज नाही वा रस्तादेखील नाही. मात्र, त्याला कारणेही तशीच आहेत. दूरवर डोंगरदऱ्यांत या पाड्यांची अगदी बोटांवर मोजता येतील, इतकी घरे आहेत.

18 villages still in darkness | १८ गावपाडे अजूनही अंधारात

१८ गावपाडे अजूनही अंधारात

Next

भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक पाडे आजही अंधारात आहेत. त्यामुळे आम्हाला वीज कधी मिळणार, असा प्रश्न या पाड्यांमधील लोकांना पडला आहे.


आज अनेक गावपाड्यांत वीज पोहोचली असली, तरी अनेक पाडे असे आहेत की, त्यांना अद्याप वीज नाही वा रस्तादेखील नाही. मात्र, त्याला कारणेही तशीच आहेत. दूरवर डोंगरदऱ्यांत या पाड्यांची अगदी बोटांवर मोजता येतील, इतकी घरे आहेत. या पाड्यांना वीज देण्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने अनेक अडचणी आहेत. त्यातही मालकी हक्काच्या जागेतून पोल टाकण्यात येणाºया अडचणी, मोठ्या प्रमाणात असणारे जंगल, वनविभागाचे अडथळे, अशा अनेक अडचणींवर मात करून गेल्या वर्षी ३८ असणारी संख्या आज १८ वर आली आहे.


उर्वरित पाडे विजेपासून वंचित असून या पाड्यांना लवकरात लवकर वीज मिळावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. सध्या तालुक्यात पर्काचापाडा, तरीचापाडा, बोरीचामाळ, तलवाडा, शिसवली, चराचापाडा, कोशिंबळे, दापूर, साखरपाडा, मसनेपाडा, वर्ध्याचापाडा, चराचापाडा, गरलेपाडा, सावरखुंट, खरमेपाडा, मोंडूलपाडा, शेंद्रूणमधील कातकरीवाडी, चौधरपाडा, सावरदेव, कासगाव या १८ पाड्यांना वीज नाही. मात्र, यापैकी सद्य:स्थितीत पर्काचापाडा, तरीचापाडा, साखरपाडा, सावरदेव या पाड्यांतील काम प्रगतीपथावर असून सावरदेव या पाड्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित पाड्यांना लवकरात लवकर वीज देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून येत्या काही दिवसांत त्यांचाही विजेचा प्रश्न सुटणार असल्याचे शहापूरचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.


तालुक्यात सध्या नवीन एक हजार ७५३ नवीन जोडण्या देणे असून पाच हजार ८०० मीटर हे फॉल्टी असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय, दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाºयांना मोफत सहा वीज मीटर देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.

Web Title: 18 villages still in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज