WIMBLDON 2018: Novak Djokovic enters the semifinals | WIMBLDON 2018 : नोव्हाक जोकोव्हिच उपांत्य फेरीत दाखल

लंडन : नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बाराव्या मानांकित जोकोव्हिचने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या केई निशिकोरीवर 6-3, 3-6, 6-2, 6-2 असा विजय मिळवला. 

उपांत्य फेरीत पोहोचल्यावर जोकोव्हिचचा आनंद य़ा व्हिडीओमध्ये पाहा


 

जोकोव्हिचने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. त्यावेळी जोकोव्हिच हा सामना सरळ सेट्मध्ये दिसेल, असे वाटले होते. पण निशिकोरीने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनागमन केले. दुसऱ्या सेटमध्ये त्याने जोकोव्हिचला 6-3 असे पराभूत करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. यानंतर तिसरा सेट चांगलाच रंगतदार होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण जोकोव्हिचने निशिकोरीला तिसऱ्या सेटमध्ये जास्त संधी दिली नाही. तिसरा सेट जोकोव्हिचने 6-2 अशा फरकाने जिंकला आणि सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये निशिकोरी पुन्हा पुनरागमन करणार की जोकोव्हिच हा सेट जिंकून सामना खिशात टाकणार, अशा चर्चांना उत आला होता. पण जोकोव्हिचने या सेटमध्येही 6-2 असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

तिसरा सेट जिंकल्यावर जोकोव्हिचने असा आनंद साजरा केला 

 

English summary:
Wimbledon Championship semifinal: Novak Djokovic has reached the Wimbledon Championship semifinals. The 12th seed Djokovic beat Japan's Kei Nishikori 6-3, 3-6, 6-2, 6-2 in the quarter-finals.


Web Title: WIMBLDON 2018: Novak Djokovic enters the semifinals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.