Miami Open: व्हीनसचा संघर्षपूर्ण विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:59 AM2018-03-27T02:59:09+5:302018-03-27T02:59:09+5:30

तीनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या व्हीनस विलियम्सने रविवारी तीन मॅच पॉर्इंटचा बचाव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या

Miami Open: Critical win of Venus | Miami Open: व्हीनसचा संघर्षपूर्ण विजय

Miami Open: व्हीनसचा संघर्षपूर्ण विजय

Next

मियामी : तीनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या व्हीनस विलियम्सने रविवारी तीन मॅच पॉर्इंटचा बचाव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. तेथे व्हीनसला गतविजेत्या योहाना कोंटाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या व्हीनसने २९ व्या मानांकित नेदरलँडच्या किकी बर्टन्सचा ५-७, ६-३, ७-५ ने पराभव केला. पहिल्या सेटमध्ये व्हीनसने ५-० अशी आघाडी घेतली होती, पण त्यानंतर तिने तीन सेट पार्इंट गमावले. बर्टन्सने सलग सात गेम जिंकत पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दुसरा सेटही रंगतदार ठरला, पण त्यात व्हीनसने सरशी साधली.
तिसºया सेटमध्ये व्हीनस १-४ ने पिछाडीवर होती. बर्टन्स ५-३ असा स्कोअर असताना सर्व्हिस करीत होती, पण दोन मॅच पॉर्इंटचा तिला लाभ घेता आला नाही. पुढच्या गेममध्ये तिला आणखी मॅच पॉर्इंट मिळाला, पण व्हीनसने त्याचा बचाव करताना विजय साकारला.
अन्य सामन्यात कोंटाने एकतर्फी झालेल्या सामन्यात बेल्जियमच्या एलिस मार्टन्सचा ६-२, ६-१ ने पराभव केला. तसेच, चौथे मानांकन प्राप्त एलिना स्वितलोना, फ्रेंच ओपन चॅम्पियन येलेना ओस्टापेंका आणि रिओ आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेती मोनिका पुइग यांनीही पुढची फेरी गाठली. (वृत्तसंस्था)

Web Title: Miami Open: Critical win of Venus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.