अमेरिकन ओपन : आॅल विल्यम्स लढतीत सेरेना विजयी, राफेल नदाल चौथ्या फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 02:01 AM2018-09-02T02:01:17+5:302018-09-02T02:01:31+5:30

सेरेना विल्यम्सने शनिवारी आपली मोठी बहीण व्हिनस हिला यूएस ओपनच्या सामन्यात पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांच्या गटात राफेल नदाल याने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.

American Open: Serena wins in All Williams | अमेरिकन ओपन : आॅल विल्यम्स लढतीत सेरेना विजयी, राफेल नदाल चौथ्या फेरीत

अमेरिकन ओपन : आॅल विल्यम्स लढतीत सेरेना विजयी, राफेल नदाल चौथ्या फेरीत

Next

न्यूयॉर्क : सेरेना विल्यम्सने शनिवारी आपली मोठी बहीण व्हिनस हिला यूएस ओपनच्या सामन्यात पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांच्या गटात राफेल नदाल याने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.
सेरेनाने व्हिनस विरोधातील ३० व्या सामन्यात ६-१, ६-२ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सेरेनाला काईया कानेपी हिच्यासोबत लढायचे आहे. पहिल्या फेरीत जागतिक रँकिंगमध्ये नंबर वन असलेल्या सिमोना हालेपला पराभूत करणाऱ्या कानेपी हिने स्वीडनच्या रेबेका पीटरसनला ६-३, ७-६ (७-३) असे पराभूत केले. पुरुष गटात राफेल नदालने रशियाच्या कारेन खाचनोवविरोधात विजय मिळवला. अव्वल मानांकित नदालला २२ वर्षांच्या खाचनोववर विजय मिळवण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. चार तास २३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात ५-७, ७-५, ७-६ (९-७),
७-६ (७-३) असा विजय मिळवला.

पुनरागमनानंतरचा हा तिचा सर्वोत्तम विजय ठरला. पुनरागमन केल्यापासून हा माझा सर्वोत्तम विजय आहे. मला वाटते की, मी आतापर्यंतचा सर्वांत चांगला सामना खेळले. - सेरेना

Web Title: American Open: Serena wins in All Williams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.