Truecaller मध्ये आता यूजर्सना मिळणार ही नवीन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:09 AM2018-07-14T10:09:37+5:302018-07-14T10:10:02+5:30

कंपनीने या फीचरबाबत सर्व माहिती त्यांच्या सपोर्ट पेजवर दिली आहे. Truecaller सतत आपल्या यूजर्सना वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत.

You can now Record Calls on Truecaller | Truecaller मध्ये आता यूजर्सना मिळणार ही नवीन सुविधा

Truecaller मध्ये आता यूजर्सना मिळणार ही नवीन सुविधा

Next

नवी दिल्ली : Truecaller या अॅप यूजर्ससाठी एक कंपनीने एक फीचर लॉन्च केलं आहे. Truecaller च्या माध्यमातून तुम्ही आता कॉल रेकॉर्ड करण्याचीही सुविधा मिळणार आहे. कंपनीने या फीचरबाबत सर्व माहिती त्यांच्या सपोर्ट पेजवर दिली आहे. Truecaller सतत आपल्या यूजर्सना वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत.

कंपनीने सांगितले की, रेकॉर्ड करण्यात आलेल्या कॉलची रेकॉर्डींग डिव्हाइसमध्ये सेव्ह होईल. हे रेकॉर्डींग Truecaller सर्व्हरवर सेव्ह होणार नाही. कंपनीने हेही सांगितलं की, ते यूजर्सचे कॉल रीड करत नाहीत आणि त्याची प्रोसेसिंगही करत नाही. कारण कंपनीच्या प्रोसेसिंगचा सन्मान करते.  

पण हे फीचर सर्वांनाच वापरता येणार नाहीये. कंपनीने सांगितलं की, जे यूजर्स अॅन्ड्रॉइड 5.0 किंवा त्याच्या पुढचं व्हर्जन वापरत असलीत तेच या फीचरचा वापर करू शकतात. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हे फीचर अॅन्ड्रॉइड .7.1.1 नूगा वर रन होणाऱ्या डिव्हाईसला सपोर्ट करत नाही. या

डिव्हाइसेसमध्ये नेक्सस, पिक्सल आणि मोटो 4 जी सारख्या डिव्हाइसचा समावेश आहे. सोबतच कंपनी यूजर्सना या फीचरचं 14 दिवसांचं फ्रि ट्रायल देत आहे. त्यानंतर हे फीचर विकत घ्यावं लागेल. 

Web Title: You can now Record Calls on Truecaller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.