World Emoji Day: फेसबुकवर ६ कोटी इमोजींचा होतो वापर, जाणून घ्या इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 11:03 AM2018-07-17T11:03:04+5:302018-07-17T11:06:38+5:30

Emoji बाबत तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाहीये. कारण रोज या इमोजींचा वापर तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर वापरता.

World Emoji Day: Know the history of Emoji Day | World Emoji Day: फेसबुकवर ६ कोटी इमोजींचा होतो वापर, जाणून घ्या इतिहास!

World Emoji Day: फेसबुकवर ६ कोटी इमोजींचा होतो वापर, जाणून घ्या इतिहास!

Emoji बाबत तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाहीये. कारण रोज या इमोजींचा वापर तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर वापरता. पण या इमोजींचा जन्म कसा झाला? कधीपासून याचा वापर करणे सुरू झाले? असा प्रश्न काहींना पडत असेलच. आज वर्ल्ड Emoji Day आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया इमोजीबाबत काही खास गोष्टी.... 

Emoji आधी व्हायचा emoticons चा वापर

इमोजीचा जन्म १९९० मध्ये झाला आणि यांना आधी emoticons असे म्हटले जायच. emoticons (emotion + icon) या दोन शब्दांपासून तयार करण्यात आला होता. याचा वापर टेक्स्टच्या जागी केला जायचा. इमोजीला जपानी एक्सप्रेशनही म्हटलं जातं. 

कुणी केले इमोजी तयार

१९९० मध्ये शिगेटिका कुरिता (Shigetaka Kurita) ने पहिला इमोजी तयार केला होता. शिगेटिका कुरिताने हा इमोजी असलेला फोटो जपानच्या NTT Docomo या टेलिकॉम कंपनीसाठी तयार केला होता. यातून लहान मुलांना गुंतवूण ठेवण्याचा उद्देश होता. 

आयफोनने केला वापर

२००७ मध्ये अॅपलने पहिला आयफोन आणला होता आणि जपानच्या मार्केटमध्ये पकड मजबूत करण्यासाठी या फोनमध्ये इमोजीचं बोर्ड देण्यात आलं होतं. हे फीचर त्यावेळी अमेरिकन युजर्ससाठी नव्हतं. पण याचा वापर करणे त्यांना कळाले होते. 

फेसबुकवर किती होतो वापर

Emojipedia चे फांऊडर Jeremy Burge ने २०१४ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड इमोजी डे ची घोषणा केली आणि तो दिवस १७ जुलै होता. 
सध्या इमोजींचा सर्वात जास्त वापर फेसबुकवर केला जातो. फेसबुकवर रोज साधारण ६ कोटी इमोजींचा वापर होतो. तर फेसबुक मॅसेंजरवर ५ अरब इमोजींचा वापर केला जातो. 

Web Title: World Emoji Day: Know the history of Emoji Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.