पाकिस्तानी नंबरवरून मेसेज आला, तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 08:03 AM2022-07-12T08:03:55+5:302022-07-12T08:04:17+5:30

परदेशातून येणारे फ्रॉड कॉल्स हा एक धोकादायक प्रकार आहे. याबाबतीत आपण काळजीपूर्वक रहावे, असा इशारा पोलीस आणि मोबाइल कंपन्या आपल्याला वारंवार देत असतात.

What will you do if you get a message from a Pakistani mobile number | पाकिस्तानी नंबरवरून मेसेज आला, तर काय कराल?

पाकिस्तानी नंबरवरून मेसेज आला, तर काय कराल?

Next

मला रविवारी रात्री पाकिस्तानातल्या एका नंबरवरून मेसेज आला आहे. मी विनाकारण एखाद्या भानगडीत सापडण्याची शक्यता नाही ना?  मी काय करू शकते?

- एक वाचक

परदेशातून येणारे फ्रॉड कॉल्स हा एक धोकादायक प्रकार आहे. याबाबतीत आपण काळजीपूर्वक रहावे, असा इशारा पोलीस आणि मोबाइल कंपन्या आपल्याला वारंवार देत असतात. फोन बरोबरच वापरकर्त्यानीदेखील स्मार्ट होणे अपेक्षित आहे.

अशा कॉल्सना किंवा मेसेजेसना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नये. व्हॉट्सॲप सारख्या  ॲपवरून थेट व्हॉइस कॉल करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने अशा कॉल्सची शक्यता वाढली आहे. संगणकीय युक्त्या वापरून स्वतःची खोटी ओळख निर्माण करणे आणि आपण केलेले कॉल्स दुसऱ्या देशांमधून केल्यासारखे भासवणे शक्य होत असते. भ्रामक व्हर्च्युअल जगात आपल्याला एखादी गोष्ट जशी दिसते आहे तशीच ती असते, असे नाही.  फोन करून पैसे लुटण्यासाठी आमिष दाखवले जाते. कॉल खोडसाळ आहे की खरा आहे, हे ओळखण्यासाठी कोणतीही निर्दोष प्रणाली उपलब्ध नाही.

संशयास्पद कॉल्सना कधीही कॉलबॅक करू नये.  ते नंबर्स तातडीने ब्लॉक करावे.  ब्लॉकसोबतच व्हॉट्सॲपने रिपोर्ट फीचरही जारी केले आहे. व्हॉट्सॲपवर  ९२ कोडसह पाकिस्तानी नंबरची तक्रार करा. त्याचा अहवाल दिल्यास त्या नंबरवर बेकायदेशीर कृत्य झाल्याचे व्हॉट्सॲपला कळेल आणि व्हॉट्सॲप त्या नंबरची चौकशी सुरू करेल. याखेरीज एक सजग भारतीय म्हणून ही घटना व्हॉट्सॲपवर ईमेलद्वारे पोहोचवणे आवश्यक आहे. व्हॉट्सॲपच्या वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती द्या. त्यामुळे इतर लोकांचा धोका कमी होइल.

पोलीस यंत्रणेनेदेखील सायबर सुरक्षेसाठी विशेष कक्ष चालविलेले आहेत. आपल्या विभागाच्या पोलीस यंत्रणेने अशा तक्रारी करण्यासाठी विशेष ऑनलाइन लिंक्स तयार केलेल्या आहेत. आपण तत्परतेने अशा विशेष कक्षांकडे तक्रार केली पाहिजे. https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावरदेखील आपण अशा तक्रारी दाखल करू शकाल.

दिलीप फडके, 
ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते  
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

Web Title: What will you do if you get a message from a Pakistani mobile number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.