Tik Tok नेमके आहे तरी काय? जाणून घ्या फायदे तोटे...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 06:21 PM2019-01-21T18:21:14+5:302019-01-23T11:32:53+5:30

सध्या फेसबुक, युट्युबवर गंमतीशीर व्हिडिओ टाकले जातात. मनोरंजन जरी होत असले तरीही अशा अ‍ॅपमुळे व्यसनाच्या आहारी जाण्याचे धोके अनेक आहेत.

What is Tik Tok App? Learn Pros and Cons... | Tik Tok नेमके आहे तरी काय? जाणून घ्या फायदे तोटे...

Tik Tok नेमके आहे तरी काय? जाणून घ्या फायदे तोटे...

googlenewsNext

- तन्मय दीक्षित, सायबर एक्सपर्ट

मुंबई : सध्या फेसबुक, युट्युबवर गंमतीशीर व्हिडिओ टाकले जातात. हे व्हिडिओ सुरु केल्यानंतर त्यावर उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यावर वॉटरमार्क दिसतो. असे व्हिडिओ कमालीचे व्हायरल होत आहेत. यामध्ये Tik tok हे अ‍ॅप ऑडिओ अँड व्हिडिओ मिक्सिंग करून लोकांना एंटरटेनमेंट व्हिडिओ दाखवण्यात अग्रेसर आहे. यामुळे मोबाईलवर सारखे पाहिल्यामुळे अनेक अडचणी जाणवतात.

 
 Tik Tok या अ‍ॅपवर अपलोड झालेला व्हिडिओ पाहून लोक त्यावरती प्रतिसाद देत असतात. बऱ्याचदा या ठिकाणी टाकलेल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद येत आहे हे पाहून त्यामध्ये अजून एक... मग पुन्हा अजून एक... असे एका मागोमाग व्हिडिओ अपलोड केले जातात आणि मग लोक यात गुरफटून जातात व ते कधी याच्या आहारी गेले हे त्यांना पण कळत नाही. गेमसारखेच अशा प्रकारच्या अॅपचे व्यसन अनेकांना लागले आहे. 


व्हिडिओ तयार करून पैसा कमावला जाऊ शकतो का ?
आपण इंटरनेटवर व्हिडिओ पाहत असताना कधी कधी छोटीशी एखादी जाहिरात दाखवली जाते. मोठा व्हिडिओ असल्यास मध्येच जाहिरात दाखवली जाते. ही जाहिरात पाहिल्यावर तो व्हिडिओ ज्याने बनवला आहे त्याला त्या बदल्यात काही मानधन दिले जाते. कारण तो व्हिडिओ पाहण्यासाठी वापरणारा काही काळ त्या वेबसाईटवर रेंगाळलेला असतो. 
आजच्या स्पर्धेच्या जीवनात बरेचजण कमी भांडवलात जास्तीतजास्त पैसे कसे मिळविता येतील यामागे असतात. जर कॉम्प्युटर आणि इंटरनेट वापरून व्हिडिओ बनवून पैसे कमावता येतात असे लक्षात आले तर ते आपले यूट्युब चॅनेल काढून त्यावर त्यांना हवे तसे ऑडिओ-व्हिडिओ टाकून घरबसल्या कमाई करू शकतात.

हे मोठे दुर्दैवच नाही का ?
Tik tok हे अ‍ॅप वापरणाऱ्यांना या व्यसनाच्या आहारी कधी गेलो याचे भान राहत नाही. अशा अप्लिकेशनचा सातत्याने वापर करत असलेली व्यक्ती त्याच्या घरातील खऱ्या नातेसंबंधावर यामुळे होणारा दुष्परिणाम कसा होत असेल याचा विचार पण करत नाही. त्यांना फक्त त्याचा ऑनलाईन रेप्युटेशनच्या मागे धावायचं असतं.

यासाठी काही नियम आहेत का ?
यासाठीचे नियम आणि उपाययोजना व्हिडिओ अपलोड आणि ब्रॉडकास्ट करणाऱ्या वेबसाईटवर दिलेले असतात. ते सर्व तर लागू होतातच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशात त्या त्या देशातील सायबर कायदादेखील तसेच इतर त्या गुन्ह्यासंबंधीतही कायदा लागू केला जाऊ शकतो.

मुले याच्या आहारी गेली आहेत हे असे ओळखाल...

  • मोबाईल दिला नाही तर खूप चिडचिडेपणा करणे.
  • इंटरनेटवरील टिकटोक सुरू न झाल्यास अस्वस्थ होणे.
  • मोबाईल वापरला तरंच बरे वाटते.
  • कामाशिवायसुध्दा इतर बरेच वेळा मोबाईल वापरणे.
  • गाडी चालवित असताना आपले लक्ष केंद्रित आणि एकाग्र असणे आवश्यक असते पण त्यावेळी देखील जर इंटरनेटवर मजकूर पाठवत, ई-मेल करत, ट्वीट करत किंवा सर्फ करत असेल तर.
  • जेवण करत असताना आणि टीव्ही बघत असतानासुद्धा जर मोबाईलवर काही न काही करत असेल तर.
  • नोटिफिकेशन रिंग वाजताच मोबाईल पाहण्याची तीव्र ईच्छा निर्माण होत असेल तर
     

शारीरिक परिणाम

  • डोळे : डोळ्यांना थकवा येणे, डोळे दुखणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, धुसर दिसायला लागणे, डोळ्यांची जळजळ होणे, खाज येणे अथवा पाणी येऊ लागणे.
  • मानदुखी : सतत खाली पाहिल्याने होणारी ( text neck ) या मध्ये जेव्हा मान पूर्ण वरती करतो तेव्हा दुखते.
  • कान : सतत हेडफोन वापरल्यास बहिरेपणा येऊ शकतो.
  • फोनवर बसणाऱ्या जीवाणूंमुळेही आजार होऊ शकतो. बऱ्याच फोनवर ई- कोलाय विषाणू आढळतो. ज्यामुळे ताप, उलट्या आणि अतिसार होऊ शकतो. फोन दूषित असल्यास त्वचेची समस्या होऊ शकते
  • पुरुषांमध्ये नपुंसकत्व : अभ्यासाने उघड केले आहे की सेलफोनचे विकिरण शुक्राणुंची संख्या, शुक्राणूची गतिशीलता आणि व्यवहार्यता कमी करतो.
     

मानसिक प्रभाव
१. उदासीनता.
२. प्रेरक अव्यवहार्य विकार.
३. रात्रीच्या वेळी जास्त चिंताग्रस्त होणे
४. झोपेची गुणवत्ता कमी होणे.
५. फोनमधून निघणारा किरणे डोक्यास घातक ठरू शकतात.

अशा प्रकारें काळजी घ्यावी
१. यासाठी आई-वडिलांनी आपली मुले मोबाईलवर काय करत असतात हे काळजीपूर्वक पाहावे.
२. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एकदम बदल घडून आलेलं लक्षात आल्यास हा बदल का घडून येत आहे याचे कारण पाहावे.
३. खरे जीवन आणि ऑनलाईन रेप्युटेशन यांतील फरक त्यांना समजून सांगावा.
४. कोणतेही इलेक्ट्रॉनिक खेळणे ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका दिवसात खेळायला देऊ नये.
५. पौष्टिक खाणे खाण्याची आवड निर्माण करावी.
६. डोळे पाण्याने सातत्याने धुवावे.

Web Title: What is Tik Tok App? Learn Pros and Cons...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.