काय ! तुमचा मोबाईल लागत नाही ?

By अनिल भापकर | Published: February 10, 2018 03:42 PM2018-02-10T15:42:30+5:302018-02-10T15:44:03+5:30

बऱ्याच वेळा तुमचा मोबाईल चालू असतो रेंज देखील असते तरी तुमचा मोबाईल लागत नाही अशी तक्रार तुमचे मित्र किंवा नातेवाईक करत असतात.अशावेळी प्रथोमोपचार म्हणून आपण काय करायला पाहिजे याविषयी आज थोडस .

What! Does not your mobile? | काय ! तुमचा मोबाईल लागत नाही ?

काय ! तुमचा मोबाईल लागत नाही ?

googlenewsNext
ठळक मुद्देबरेचदा आपल्या फोनवर एक मेसेज येतो. ‘इन्सर्ट सीम’ किंवा ‘नो सीम.’ स्मार्टफोन चालू असताना किंवा नवीन स्मार्टफोनमध्ये सीम टाकलं की, बर्‍याचदा हा एरर मेसेज स्मार्टफोनवर दिसतो. अशावेळी सीमकार्ड काढून ते कुठे डॅमेज झालेलं दिसतंय का हे आधी तपासा. अनेकवेळा असा नेटवर्क धरसोड करण्याचा प्रॉब्लेम असेल, तर हा स्मार्टफोनचा नसून सीमकार्डचा असतो. मग तातडीनं सीमकार्ड बदलायला हवं. एखाद्या वेळी मोबाइल पावसात भिजला किंवा पाण्यात पडला तरी बरेचदा मोबाइल नेटवर्क जातं. आपण मोबाइल स्वच्छ पुसून कोरडा करतो; मात्र सीमकार्ड कोरडे करून साफ करत नाही.

बऱ्याच वेळा तुमचा मोबाईल चालू असतो रेंज देखील असते तरी तुमचा मोबाईल लागत नाही अशी तक्रार तुमचे मित्र किंवा नातेवाईक करत असतात.अशावेळी प्रथोमोपचार म्हणून आपण काय करायला पाहिजे याविषयी आज थोडस .

सीमकार्ड म्हणजे स्मार्टफोनचं हृदय. हृदय बंद पडलं सगळा खेळ खल्लास, नुस्तं शरीर बिचारं काय करणार ? तेच सीमकार्डचं. स्मार्टफोन कितीही महागडा असो सीमकार्ड नसेल तर त्याचा फोन म्हणून काहीच उपयोग नाही. बिनासीमकार्ड स्मार्टफोन म्हणजे केवळ एण्टरटेनमेण्ट बॉक्स. सीम अर्थात सबस्क्रायबर आयडेण्टीटी मॉडेल. हे एक पोर्टेबल मेमरी चीप असतं. या सीममुळेच आपण स्मार्टफोनवरून जगभरात कुठेही संपर्क साधू शकतो. सीम हीच आपली एकप्रकारे ओळख असते. हे सीमकार्ड स्मार्टफोनमधून सहजगत्या काढता येतं, परत बसवता येतं. तसंच एकच सीमकार्ड हे वेगवेगळ्या मोबाइलमध्येही वापरता येतं. या एवढुशा सीमकार्डमध्ये सीम नंबर असतो, अँड्रेसबुक असतं, नेटवर्क अँथोरायजेशन डेटा, टेक्स्ट मॅसेज, सिक्युरिटी कि अशी बरीच अन्य माहितीही असते. मग हे सीमकार्ड जर एवढं महत्त्वाचं असेल तर त्याची काळजी घ्यायला हवी. ते लवकर खराब होऊ नये म्हणून जपायलाही हवं! कारण हे सीमकार्ड खराब होतं, ते खराब झालंय हेसुद्धा आपल्याला समजायला हवं.पण कसं? 

सीमकार्ड खराब होतं म्हणजे काय होतं?

१) बरेचदा आपल्या फोनवर एक मेसेज येतो. ‘इन्सर्ट सीम’ किंवा ‘नो सीम.’ स्मार्टफोन चालू असताना किंवा नवीन स्मार्टफोनमध्ये सीम टाकलं की, बर्‍याचदा हा एरर मेसेज स्मार्टफोनवर दिसतो. अशावेळी सीमकार्ड काढून ते कुठे डॅमेज झालेलं दिसतंय का हे आधी तपासा. 

२) जर सीमकार्ड व्यवस्थित दिसत असेल, क्रॅक पडलेल्या नसतील तर स्वच्छ कापडाने साफ करून परत स्मार्टफोनमध्ये टाकावं. त्याचप्रमाणे स्मार्टफोनमध्ये ज्या ठिकाणी सीमकार्ड बसते त्या ठिकाणी कॉण्टॅक्ट (सोनेरी काड्या) स्वच्छ कापडाने पुसता आल्या तर त्याही पुसाव्या. असं केल्यानं सीम कधीकधी सुरू होतं, पण तरीसुद्धा सीमकार्ड चालू होत नसेल, तर मात्र संबंधित मोबाइल सेवा देणार्‍या कंपनीकडून दुसरं सीमकार्ड घ्यावं.

३) अनेकवेळा स्मार्टफोन मधून-मधून नेटवर्क पकडत नाही. नेटवर्क गेलं की, आपण आधी शेजार्‍यांच्याच्या मोबाइलला नेटवर्क आहे का, ते पाहतो. जर दुसर्‍याच्या फोनला नेटवर्क असेल तर आपण आपला स्माटफोन रिस्टार्ट करतो आणि मोबाइल नेटवर्क पकडायला लागतो.

४) अनेकवेळा असा नेटवर्क धरसोड करण्याचा प्रॉब्लेम असेल, तर हा स्मार्टफोनचा नसून सीमकार्डचा असतो. मग तातडीनं सीमकार्ड बदलायला हवं.

५) एखाद्या वेळी मोबाइल पावसात भिजला किंवा पाण्यात पडला तरी बरेचदा मोबाइल नेटवर्क जातं. आपण मोबाइल स्वच्छ पुसून कोरडा करतो; मात्र सीमकार्ड कोरडे करून साफ करत नाही. अशावेळी सीम बाहेर काढून काहीवेळ हवेत ठेवावं. त्यानंतर कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून परत मोबाइलमध्ये टाकावं.

Web Title: What! Does not your mobile?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.