येणार लाकडी आवरणयुक्त स्मार्टफोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:20 PM2018-04-02T17:20:04+5:302018-04-02T17:20:04+5:30

धातू आणि सिरॅमिकला पर्याय म्हणून लवकरच लाकडी आवरण असणारे स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

WATCH WATCH SMARTPHONE! | येणार लाकडी आवरणयुक्त स्मार्टफोन !

येणार लाकडी आवरणयुक्त स्मार्टफोन !

googlenewsNext

मुंबई - धातू आणि सिरॅमिकला पर्याय म्हणून लवकरच लाकडी आवरण असणारे स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. स्मार्टफोनमधील विविध फिचर्स म्हणजेच डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी, रॅम/स्टोअरेज आदींसोबत याचे आवरण (कव्हर) हादेखील अतिशय महत्वाचा घटक असतो. अलीकडच्या काळात बर्‍याच स्माटर्र्फोनमध्ये मेटल, ग्लास वा सिरॅमिकपासून तयार करण्यात आलेले आवरण देण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. यात उच्च श्रेणीतील म्हणजेच फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये ग्लास वा मेटल तर अन्य किफायतशीर दरातल्या स्मार्टफोन्समध्ये सिरॅमिकचा वापर केलेला असतो. आता मात्र लवकरच लाकडी आवरण असणारे स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.

खरं तर धातूंचे आवरण असणारा स्मार्टफोन हा अतिशय मजबूत असतो. स्मार्टफोनच्या दीर्घ काळ वापरामुळे बॅटरी, प्रोसेसर व एकंदरीतच संपूर्ण उपकरण गरम होत असतांना याला तातडीने थंड करण्याची प्रक्रियादेखील यामुळे जलद गतीने होत असते. तथापि, याचे अनेक तोटेदेखील आहेत. मेटलचे आवरण असणारा स्मार्टफोन हा वायरलेस चार्जींगला अवरोध निर्माण करत असतो. यामुळे स्मार्टफोनच्या अँटेनाच्या कार्यक्षमतेतही घट होत असते. उच्च दर्जाचे सिरॅमिक हा चांगला पर्याय आहे. यामुळे स्मार्टफोनला ओरखडे पडत नाहीत. तरी तो धातूइतका टिकावू नाहीय. विशेष करून उंचावरून पडल्यास हे आवरण तुटण्याची शक्यता असते. या सर्व बाबींचा विचार केला असता, लाकडी आवरण उपयुक्त ठरू शकते. २०१४ साली मोटोरोला कंपनीने मोटो-एक्स या स्मार्टफोनमध्ये लाकडी आवरण प्रदान केले होते. याशिवाय अन्य मॉडेल्समध्ये याला फॅशनच्या स्वरूपात देण्यात आले आहे. तथापि, लाकडाच्या गुणधर्मांमध्ये विशिष्ट प्रक्रिया करून बदल करत सुपरवुडची निर्मिती करून याचेच आवरण स्मार्टफोनला प्रदान करण्याचा ट्रेंड आता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेरीलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका चमूने सुपरवुडच्या निर्मितीत यश मिळवले आहे. याच्या अंतर्गत नैसर्गीक लाकडातून लीग्नीन विलग केले जाते. यानंतर याला ६५ अंश सेल्सीयस तापमानावर एका प्रक्रियेच्या माध्यमातून कॉम्प्रेस केले जाते. यातून तयार झालेले लाकूड अगदी स्टील व टिटॅनियम अलॉयपेक्षाही मजबूत असते हे विशेष. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे सुपरवुड अन्य पर्यायांपेक्षा स्वस्त असल्यामुळे स्मार्टफोनचे आवरण म्हणून याचा वापर उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: WATCH WATCH SMARTPHONE!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.