Valentine Day: रोमँटिक होऊन ऑनलाइन गिफ्टच्या नादात लागेल चुना, जरा जपून!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 02:44 PM2024-02-13T14:44:11+5:302024-02-13T14:48:29+5:30

Valentine Day Scams: व्हलेंटाइन डे जवळ आलाय, या सर्रास होणाऱ्या चुका टाळा नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं

Valentine Day Scams Do not get romantic with the sound of online gifts be careful | Valentine Day: रोमँटिक होऊन ऑनलाइन गिफ्टच्या नादात लागेल चुना, जरा जपून!

Valentine Day: रोमँटिक होऊन ऑनलाइन गिफ्टच्या नादात लागेल चुना, जरा जपून!

Valentines Day Scams, Gifts Links Sites: व्हॅलेंटाइन्स डे अवघ्या २४ तासांवर आला आहे. आपल्या प्रियजनांना या खास दिवशी खुश करण्यासाठी सर्वच जण छोटं मोठं गिफ्ट देत असतात. काही सिंगल लोक या दरम्यान, ऑनलाइन डेटिंगचा देखील पर्याय निवडतात. व्हलेंटाइन्स वीक च्या कालावधीत विविध साइट्स यासंबंधीच उत्साही युवांना काही ऑफर्स किंवा डिस्काउंट देत असतात. पण याचाच गैरफायदा घेण्यासाठी ऑनलाइन फ्रॉड करणारी हॅकर मंडळी सक्रिय झाली आहेत. जाणून घेऊया यासंबंधीच्या महत्त्वाच्या बाबी.

ऑनलाइन डेटिंग मधील फ्रॉड आणि खोटारडेपणापासून कसे वाचावे?

व्हलेंटाइन डे हा तरूणाईचा आवडता सण असतो. हा सण दोन प्रकारे साजरा केला जातो. पहिला भाग म्हणजे, यात ऑनलाइन डेटिंगचा समावेश असतो. अशा प्रकारात सहसा लोक आपला लाइफ पार्टनर ऑनलाइन पद्धतीने शोधायचा प्रयत्न करत असतात. याच गोष्टीचा गैरफायदा घेत काही हॅकर मंडळी स्कॅम करतात आणि फसव्या डेटिंग साइट्स चालवतात. अशा साइट्सवर तुमच्याशी अतिशय रोमँटिक गप्पा मारल्या जातात. त्यानंतर तुमच्याशी गोड बोलून तुमची काही महत्त्वाची माहिती काढून घेतली जाते आणि त्याचा गैरवापर केला जातो. त्याशिवाय तुमच्यावर पैसे करण्यासाठी दबाव टाकला जातो. एकदा का तुम्ही तुमच्याबद्दलच्या बाबी शेअर केल्यात की हॅकर तुमचं बँक अकाऊंट रिकामं करायला फारसा वेळ लावत नाहीत. त्यामुळे असा फसव्या डेटिंग साइट्सपासून तुम्ही चार हात लांबच राहायला हवे. तसेच कोणत्याही साइट्सशी आपली संवेदनशील किंवा महत्त्वाची माहिती शेअर करू नये.

व्हलेंटाइन डे बद्दलचा दुसरा भाग म्हणजे आपल्या प्रियजनांना किंवा नव्याने ओळख झालेल्यांना गिफ्ट पाठवणे. फसव्या साइट्स काही लिंक तयारच करून ठेवतात ज्यावर क्लिक करण्याचा पर्याय असतो. आपल्या पार्टनरला गिफ्ट पाठवण्यासाठी या लिंक वर विविध पर्याय लिहिले असतात. त्यासोबतच काही खास डिस्काउंट दिले जातात. महत्त्वाची बाब म्हणजे, ही लिंक पूर्णपणे फसवी असते. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही काहीही करायला गेलात तर तुम्हाला काही कळण्याआधीच तुमची माहिती हॅकरला जाते आणि त्यातून तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

स्कॅम मधून कसे वाचाल?

मोबाईल यूजर्ससाठी विशेषकरून या फसव्या लिंक पाठवल्या जातात. सोशल मीडिया खासकरुन इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर सारख्या साइट्सवर अशा प्रकारच्या अनेक लिंक्स येतात. त्यात लिंकवर क्लिक केल्यावर थर्ड पार्टी लिंक ओपन होते आणि आपल्याला काहीही कळायच्या आतच फसवणूक झालेली असते.

Web Title: Valentine Day Scams Do not get romantic with the sound of online gifts be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.