स्मार्टफोन विश्वातली मारुती! जगात या कंपनीने विकले सर्वाधिक स्मार्टफोन; Apple चा कितवा नंबर? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 08:30 PM2024-02-09T20:30:35+5:302024-02-09T20:30:53+5:30

सॅमसंग, अॅप्पलला चीनच्या वनप्लस, व्हिवो, शाओमी सारख्या कंपन्यांची टक्कर मिळत आहे. परंतु, या चिनी कंपन्यांना दोन्ही कंपन्या पुरून उरत आहेत. 

This company has sold the most smartphones in the world; What is Apple's number? | स्मार्टफोन विश्वातली मारुती! जगात या कंपनीने विकले सर्वाधिक स्मार्टफोन; Apple चा कितवा नंबर? 

स्मार्टफोन विश्वातली मारुती! जगात या कंपनीने विकले सर्वाधिक स्मार्टफोन; Apple चा कितवा नंबर? 

वाहन उद्योग असो की अन्य कोणताही उद्योग त्यात प्रत्येक कंपनी पहिले येण्यासाठी स्पर्धा करत असते. स्मार्टफोन बाजारात कोरिया, अमेरिकन कंपन्यांना चिनी कंपन्यांकडून कडवी टक्कर मिळत आहे. सॅमसंग, अॅप्पलला चीनच्या वनप्लस, व्हिवो, शाओमी सारख्या कंपन्यांची टक्कर मिळत आहे. परंतु, या चिनी कंपन्यांना दोन्ही कंपन्या पुरून उरत आहेत. 

सर्वात महागडे महागडे अशी टीका झेलूनही अॅप्पलने २०२३ मध्ये सर्वाधिक स्मार्टफोन विकले आहेत. iPhone 14 Pro Max हा स्मार्टफोन २०२३ मध्ये सर्वाधिक विकला गेला आहे. याचे ३४ दशलक्ष युनिट विकले गेले आहेत. दुसऱ्या स्थानावर iPhone 15 Pro Max आहे. याचे ३३ दशलक्ष युनिट विकले गेले आहेत. iPhone 14 तिसऱ्या स्थानावर आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावरही अॅप्पलचेच फोन आहेत. 

सॅमसंगचे तीन स्मार्टफोन देखील या यादीत आहेत. Galaxy A14 4G चे 21 दशलक्ष युनिट शिप करण्यात आले आहेत. Galaxy A54 5G आणि Galaxy A14 5G हे फोन २० मिलिअन आणि १९ मिलिअन एवढे विकले गेले आहेत. या यादीत वनप्लस, व्हिवो, शाओमीच्या फोनना स्थान देण्यात आलेले नाहीय. 

Web Title: This company has sold the most smartphones in the world; What is Apple's number?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.