इलॉन मस्क Netflix आणि YouTube'ला टक्कर देणार! लाँच करणार नवीन व्हिडीओ App; मोठ्या स्क्रिनवरही पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 10:01 AM2024-03-10T10:01:04+5:302024-03-10T10:03:37+5:30

उद्योगपती इलॉन मस्क यांनी काही महिन्यापूर्वीच ट्विटर आपल्या ताब्यात घेऊन मोठे बदल केले होते, आता मस्क व्हिडीओ अॅपमध्ये काम सुरू करणार आहेत.

social media platform x offer long video service on smart tv soon says elon musk | इलॉन मस्क Netflix आणि YouTube'ला टक्कर देणार! लाँच करणार नवीन व्हिडीओ App; मोठ्या स्क्रिनवरही पाहता येणार

इलॉन मस्क Netflix आणि YouTube'ला टक्कर देणार! लाँच करणार नवीन व्हिडीओ App; मोठ्या स्क्रिनवरही पाहता येणार

अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांनी काही महिन्यापूर्वीच ट्विटर आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, आता इलॉन मस्क नवीन व्हिडीओ अॅप सुरू करणार आहेत. यामुळे आता नेटफ्लिक्स,YouTube आणि OTT ॲप्सला टक्कर बसणार आहे. ट्विटर प्लॅटफॉर्मवरून ही सेवा उपलब्ध होईल. म्हणजेच स्मार्ट टीव्हीवर व्हिडीओ पाहण्यासाठी एक नवीन सेवा उपलब्ध होणार आहे, याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली आहे.     

फेसबुक, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल

इलॉन मस्क एक मेगा प्लॅन बनवत आहे, या अंतर्गत सुपर ॲप सेवा सुरू केली जाईल. एकाच ॲपमध्ये सर्व सुविधा उपलब्ध होतील. आता पर्यंत गेल्या ऑक्टोबरमध्ये एक्स च्या निवडक वापरकर्त्यांसाठी व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंग सुविधा देण्याची घोषणा केली होती. तसेच ऑनलाइन पेमेंट सेवा देण्याची घोषणा केली आहे.

इलॉन मस्क यांनी घोषणा केली की, एक्स'चे मोठे व्हिडीओ लवकरच स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध होतील.  व्हिडीओ लवकरच सोशल नेटवर्क एक्सवरून स्मार्ट टेलिव्हिजनवर पाहण्यायोग्य असेल. एका अहवालानुसार, इलॉन मस्क यांचे नवीन ॲप गुगलच्या यूट्यूब टीव्ही ॲपसारखे असू शकते, जे व्हिडीओ क्षेत्रात व्हिडीओ स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर आहे. याला टक्कर देण्यासाठी इलॉन मस्क व्हिडीओ सेवा घेऊन येत आहे. यामुले आता आणखी एक व्हिडीओ अॅप नेटकऱ्यांना मिळणार आहे. 

Web Title: social media platform x offer long video service on smart tv soon says elon musk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.