lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फेसबुक, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल

फेसबुक, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल

फेसबुक-इन्स्टाग्रामला काही काळ ब्रेक लागल्याने झुकरबर्गची 'एवढी' संपत्ती गेली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 05:58 PM2024-03-09T17:58:53+5:302024-03-09T17:59:23+5:30

फेसबुक-इन्स्टाग्रामला काही काळ ब्रेक लागल्याने झुकरबर्गची 'एवढी' संपत्ती गेली!

facebook instagram down meta ceo mark zuckerberg loses 3 billion dollars lakhs crore rupees | फेसबुक, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल

फेसबुक, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल

Facebook Instagram Down, Mark Zuckerberg Loss: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम मंगळवारी बंद झाले. त्यामुळे मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (मार्क झुकरबर्ग नेट वर्थ) यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्सच्या युजर्सना मंगळवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉगिन करण्यात अडचणींचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना त्यांच्या हँडसेटमध्येही स्वत:हून लॉग आऊट झाल्याचा अनुभव आला. अनेक युजर्सनी ही माहिती YouTube आणि X प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर केली. त्यानंतर तासाभराने दोन्ही प्लॅटफॉर्म पूर्ववत काम करु लागले. पण तासाभराच्या ब्रेकनेदेखील त्यांना मोठा फटका बसल्याचे समोर आले.

किती झाले नुकसान?

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, झुकेरबर्गची एकूण संपत्ती एका दिवसात $2.79 अब्ज डॉलरने घसरून $176 अब्ज झाली. सुमारे 3 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २ लाख कोटी रुपयांचे त्यांचे नुकसान झाले. परंतु असे असले तरी ते जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम राहिले. फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्यामुळे मेटा शेअर्समध्येही १.६ टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिले. वॉल स्ट्रीटवर मेटा शेअर्स प्रति शेअर $490.22 वर बंद झाले होते.

एलॉन मस्कचा टोला

फेसबुक आणि इंस्टाग्राम आउटेज दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेक मीम्स व्हायरल होऊ लागले. एक्स मालक एलॉन मस्कने मेटाची खिल्ली उडवली. मस्कने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल तर आमचे सर्व्हर काम करत आहेत.

फेसबुक आणि इंस्टाग्राम का बंद होते?

डाउन डिटेक्टरवर हजारो लोकांनी वेबसाइट्स डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मेटाचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी सांगितले की, मंगळवारी ही समस्या आली आणि दूरही झाली. सेवा बंद असल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तांत्रिक अडचणींमुळे फेसबुक आणि इन्स्टा डाऊन झाले होते, ते आता दुरुस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.

Web Title: facebook instagram down meta ceo mark zuckerberg loses 3 billion dollars lakhs crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.