तुम्ही ई-सिमचा वापर करायला हवा का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 10:10 AM2022-12-25T10:10:48+5:302022-12-25T10:11:28+5:30

सध्या स्मार्टफोन उत्पादक ई-सिम स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

should you use e sim know about its benefits | तुम्ही ई-सिमचा वापर करायला हवा का?

तुम्ही ई-सिमचा वापर करायला हवा का?

googlenewsNext

सध्या स्मार्टफोन उत्पादक ई-सिम स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी भविष्यातील तंत्रज्ञान मानले जाणारे ई-सिम आता मुख्य प्रवाहात येत आहे. भारतातही काही कंपन्या ई-सिम सेवा पुरवत आहेत. 

ई-सिम म्हणजे काय? 

हे एम्बेडेड सिम ग्राहकांना ओळखण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी वापरण्यात येणारी माहिती संग्रहित करते. ई-सिम फोनमधून काढले जाऊ शकत नाही. ई-सिम बदलण्यासाठी सिम ट्रे उघडायची गरज नाही. त्याऐवजी, नेटवर्क पुरवठादाराला फोन करावा लागेल, क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. 

फायदे

- ऑपरेटर बदलता तेव्हा सिम कार्ड बदलण्याची अजिबात गरज नाही. 

- एका ई-सिमवर अन्य व्हर्च्युअल सिम कार्ड साठवता येतात.

- एका नेटवर्कवर समस्या असल्यास दुसरे नेटवर्क स्वीच करणे सोपे होते. 

- डिव्हाइस चोरीला गेल्यास गुन्हेगाराला तुमचे सिम काढणे कठीण होईल, उलट त्याला ट्रॅक करणे सोपे होईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: should you use e sim know about its benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.