धक्कादायक...एका स्क्रूसाठी अ‍ॅपलने चीनमध्ये लाखोंना रोजगार दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:51 PM2019-01-29T12:51:04+5:302019-01-29T12:51:44+5:30

पुढील काळात अ‍ॅपल भारत आणि व्हिएतनामसारख्या देशांवर लक्ष ठेवून आहे. अ‍ॅपलने त्यांची उत्पादने बनविण्यासाठी चीनमध्ये मोठमोठे कारखाने उघडले आहेत आणि लाखो लोकांना रोजगारही उपलब्ध केला आहे. 

Shocking ... Apple has provided millions of jobs in China for a screw | धक्कादायक...एका स्क्रूसाठी अ‍ॅपलने चीनमध्ये लाखोंना रोजगार दिला

धक्कादायक...एका स्क्रूसाठी अ‍ॅपलने चीनमध्ये लाखोंना रोजगार दिला

Next

न्युयॉर्क : बोईंगसारख्या मोठमोठ्या विमानांसह अनेक जागतिक उत्पादने बनविणाऱ्या अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे चीनचे फावले आहे. अ‍ॅपलच्या मॅकबूक आणि कॉम्प्युटरसाठी लागणारे स्क्रू हे अमेरिकेमध्ये गरजेच्या उत्पादनांमध्ये येत नसल्याने ते चीनला बनवावे लागत आहेत. अमेरिकेत एवढे छोटे स्क्रू मिळत नसल्याने अ‍ॅपलला मॅकबूक आणि कॉम्प्युटर बनविण्याचा प्लांट चीनमध्ये हलवावा लागल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. 


या छोट्याशा स्क्रूमुळे अ‍ॅपलने 2017 मध्ये चीनला तब्बल 11 लाख कोटींचा व्यवसाय दिला. यामध्ये अमेरिकेतील कुशल कामगार आणि खर्च ही कारणेदेखील आहेत. 


अमेरिकेमध्ये स्क्रू बनत नसल्याने काही महिने अ‍ॅपलने आयफोन आणि कॉम्प्युटरच्या विक्रीला थांबवावे लागले होते. भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी अ‍ॅपलने अमेरिका सोडण्याचा निर्णय घेत हा व्यवसाय थेट चीनला वळविला. यासाठी पुढील काळात अ‍ॅपल भारत आणि व्हिएतनामसारख्या देशांवर लक्ष ठेवून आहे. अ‍ॅपलने त्यांची उत्पादने बनविण्यासाठी चीनमध्ये मोठमोठे कारखाने उघडले आहेत आणि लाखो लोकांना रोजगारही उपलब्ध केला आहे. 

Web Title: Shocking ... Apple has provided millions of jobs in China for a screw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.