4 रिअर कॅमेऱ्यांनंतर सॅमसंग आता 12 जीबी रॅमचा स्मार्टफोन करणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 04:52 PM2018-11-27T16:52:04+5:302018-11-27T16:52:15+5:30

सॅमसंगनं जगातील पहिला चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.

Samsung will now launch a 12 GB RAM smartphone after 4 rear cameras | 4 रिअर कॅमेऱ्यांनंतर सॅमसंग आता 12 जीबी रॅमचा स्मार्टफोन करणार लाँच

4 रिअर कॅमेऱ्यांनंतर सॅमसंग आता 12 जीबी रॅमचा स्मार्टफोन करणार लाँच

Next

नवी दिल्ली- सॅमसंगनं जगातील पहिला चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. आता सॅमसंग कंपनी जगातला दुसरा 12 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्नुसार, कंपनी लवकरच स्मार्टफोन Galaxy S10मध्ये 12 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. हाँगकाँग बेस्ड जीएफ सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, Galaxy S10मध्ये 1 टीबी मेमरीसह 12 जीबीच्या रॅमची व्यवस्था करण्यात आली आहे. कंपनीनं आतापर्यंत 8 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर कंपनी 10जीबी रॅम असलेला मोबाइल बाजारात आणेल असं वाटतं होतं. परंतु कंपनीनं थेट 12 जीबी रॅम असलेला थोडा हटके मोबाइल लाँच केला आहे.

तर दुसरीकडे 10 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन शाओमीनं ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. Xiaomiनं 10 जीबी रॅम असलेला ब्लॅक शार्क हिलीओ स्मार्टफोन ग्राहकांसाठी बाजारात आणला आहे. इंटर्नल मेमरीसाठीही सॅमसंगनं 512 मेमरी असलेला स्मार्टफोन Galaxy Note 9 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमधील टॉप मॉडलमध्ये 512 जीबीची मेमरी देण्यात आली आहे. दुसऱ्या रिपोर्टनुसार, Galaxy S10मध्ये 5जी कनेक्टिव्हिटीचाही सपोर्ट देण्यात आलेला आहे. यात आपल्याला 6.7 इंचीचा मोठा डिस्प्ले देण्यात आलेला असून, क्वॉड कॅमेरा सेटअप असेल.

Galaxy S10+मध्ये 12 जीबीचा रॅम देण्यात आला आहे. कंपनीनं हल्लीच Exynos 9820 प्रोसेसरची घोषणा केली आहे. सॅमसंगचे पुढील मोबाइल Galaxy S10 आणि S10+ हे नव्या प्रोसेसरवर चालणार आहेत. Galaxy S10मध्ये तीन प्रकारचे मॉडल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यातील एकात 6.4 इंचाचा डिस्प्ले बसवण्यात आला आहे. तसेच तीन रिअर कॅमेरे असतील. तर तिसऱ्या मॉडलमध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून, दोन रिअर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परंतु या मोबाईलच्या किमती पहिल्या स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त असतील. 

Web Title: Samsung will now launch a 12 GB RAM smartphone after 4 rear cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग