शाओमीचे खास बालकांसाठी फोन वॉच

By शेखर पाटील | Published: May 21, 2018 10:54 AM2018-05-21T10:54:39+5:302018-05-21T10:54:39+5:30

शाओमी कंपनीने मी बनी चिल्ड्रन फोनवॉच २ सी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल खास मुलांसाठी विकसित करण्यात आले आहे.

Phone Watch for Shaomi's Special Children | शाओमीचे खास बालकांसाठी फोन वॉच

शाओमीचे खास बालकांसाठी फोन वॉच

googlenewsNext

शाओमी कंपनीने मी बनी चिल्ड्रन फोनवॉच २ सी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल खास मुलांसाठी विकसित करण्यात आले आहे.

शाओमीने आधीच मी बनी चिल्ड्रन फोनवॉच बाजारपेठेत सादर केले असून याचीच दुसरी आवृत्ती आता लाँच करण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच असून यामध्ये कॉलींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात जीपीएस हे इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यामुळे हे वॉच वापरणारे बालक कुणेही गेले तरी त्याचे अचूक लोकेशन त्याच्या पालकांना कळू शकते. सुरक्षेसाठी हे फिचर अतिशय महत्वाचे मानले जात आहे. तसेच हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे ते अगदी पाण्यातदेखील सहजपणे वापरता येते. यामध्ये गोलाकार पीएमओएलईडी डिस्प्ले देण्यात आलेला असून हे मॉडेल स्काय ब्ल्यू आणि ऑरेंज या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

शाओमीच्या मी बनी चिल्ड्रन फोन वॉच २ सी या मॉडेलमध्ये नॅनो सीमकार्ड टाकण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने कॉल करता येतील. तसेच याचा वापर करून व्हाईस मॅसेजदेखील पाठवता येणार आहेत. यामध्ये संबंधीत युजर आपल्या पालकांच्या क्रमांकासह एकूण १० मोबाईल क्रमांक सेव्ह करून ठेवू शकतो. त्यांना आपत्कालीन अवस्थेत संदेश पाठविण्याची सुविधा यात करण्यात आली आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे. यात ३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये सादर करण्यात आले आहे. नंतर याला भारतासह अन्य देशांमध्ये सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.

Web Title: Phone Watch for Shaomi's Special Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.