अल्काटेल ए३ १० टॅबलेटची नवीन आवृत्ती

By शेखर पाटील | Published: April 26, 2018 01:56 PM2018-04-26T13:56:37+5:302018-04-26T13:56:37+5:30

अल्काटेल कंपनीने फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणार्‍या आपल्या ए ३ १० या टॅबलेटची नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर केली आहे.

The new version of Alcatel A310 tablet | अल्काटेल ए३ १० टॅबलेटची नवीन आवृत्ती

अल्काटेल ए३ १० टॅबलेटची नवीन आवृत्ती

googlenewsNext

गेल्या वर्षीच्या जून महिन्यात अल्काटेल ए३ १० हा टॅबलेट लाँच करण्यात आला होता. याची खासियत म्हणजे यात फो-जी नेटवर्कचा सपोर्ट प्रदान करण्यात आलेला होता. बाजारपेठेत याला चांगला प्रतिसाद लाभला होता. आता याचीच नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. यात आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक चांगला लूक आणि थोडे उच्च फिचर्स दिलेले आहेत. तथापि, आधीच्या मॉडेल एवढ्याच म्हणजे ९,९९९ रूपये मूल्यात याला ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा हा टॅबलेट स्लीम आहे. यासोबत याच्या मागील बाजूस थ्रीडी टेक्स्चर प्रदान करण्यात आले आहे.

अल्काटेल ए३ या मॉडेलमध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर हा टॅबलेट ८ व ५ मेगापिक्सल्सच्या अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज आहेत. यातील बॅटरी ४,६०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. 

अल्काटेल पीओपी४ १० या मॉडेलमध्ये वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय डायरेक्ट, हेडफोन जॅक आदी फिचर्स दिलेले आहेत. अल्काटेल ए३ मॉडेलमध्ये कुणीही फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट असणारे सीमकार्ड टाकून व्हाईस कॉलींगसह इंटरनेटचा वापर करू शकतो. हा टॅबलेट ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे
 

Web Title: The new version of Alcatel A310 tablet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.