Micromax Yu Ace to go on sale on Flipkart at 12PM today | Micromax Yu Ace स्मार्टफोनचा पुन्हा फ्लॅश सेल; जाणून घ्या फीचर्स...
Micromax Yu Ace स्मार्टफोनचा पुन्हा फ्लॅश सेल; जाणून घ्या फीचर्स...

नवी दिल्ली : मायक्रोमॅक्सच्या सब-ब्रँड YU ने सध्या आपला लेटेस्ट YU Ace स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आणला होता. या स्मार्टफोनची गेल्या 6 सप्टेंबरला फ्लॅश सेलच्या माध्यमातून ऑनलाइन विक्री करण्यात आली होती. पुन्हा कंपनीने आज YU Ace स्मार्टफोनचा फ्लॅश सेल आणला आहे. YU Ace स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करायचं असेल तर आज दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर एक्सक्लुझिव्ह सेलमध्ये खरेदी करु शकतात. 

YU Ace स्मार्टफोन ग्राहकांना Charcol Grey, Elektric Blue आणि Rose Gold कलरमध्ये मिळू शकणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँचिंगच्यावेळी घोषणा केली होती की, YU Ace स्मार्टफोन फक्त दोनवेळाच फ्लॅश सेलच्या माध्यमातून विकला जाईल. त्यानंतर मार्केटमध्ये विक्री करण्यात येईल. तसेच, यावेळी स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल माहिती देण्यात आली होती. मात्र, किंमत किती असेल, त्याविषयी काहीही सांगण्यात आले नव्हते.  

YU Ace स्मार्टफोन 5.45 इंचाचा एचडी + डिस्प्ले 18:9 स्क्रीन रेश्योचा देण्यात आला आहे. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 4,000 एमएएच बॅटरीची सोय आहे. तसेच, लेटेस्ट अॅन्ड्राइड ओरिओ ऑपरेटिंग सिस्टिम आहे. यासोबतच, फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉकचे फीचर देण्यात आले आहेत.  


Web Title: Micromax Yu Ace to go on sale on Flipkart at 12PM today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.