Facebook Feed : ‘लोचा झाला रे,’ Facebook वर फीडमध्येमध्ये अजब पोस्ट; युझर्स त्रासले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:25 PM2022-08-24T15:25:11+5:302022-08-24T15:25:52+5:30

Facebook Feed : अनेक जण फेसबुक हॅक झालं आहे का, असा प्रश्न विचारू लागले आहेत. युझर फीडमध्ये दिसणारे पोस्ट यामागील कारण आहे.

is facebook hacked news feed inundated with strange posts due to glitch know details | Facebook Feed : ‘लोचा झाला रे,’ Facebook वर फीडमध्येमध्ये अजब पोस्ट; युझर्स त्रासले

Facebook Feed : ‘लोचा झाला रे,’ Facebook वर फीडमध्येमध्ये अजब पोस्ट; युझर्स त्रासले

googlenewsNext

Facebook Feed :  जर तुम्ही फेसबुकचा वापर करत असाल तर तुम्ही युझर फीड तपासून पाहा. त्यामुळे तुम्हाला नेहमीपेक्षा काही निराळं दिसू लागेल. जगभरात अनेक युझर्सना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. युझर्सना त्यांच्या फीडमध्ये काही अजब पोस्ट दिसत आहेत. कधी तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीचं अकाऊंट हॅक झाल्याचं वाटेल, तर काही वेळा तुम्हाला अनेक युझर्सची अकाऊंट हॅक झाल्याचं वाटेल.

ही समस्या का येत आहे, याबाबत फेसबुकनं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. जगभरातील फेसबुक युझर्सना याचा सामना करावा लागत आहे. यामागे हॅकिंग असण्याची शक्यता कमी असून काही टेक्निकल ग्लिच असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेसबुकवर युझर फिडवर अनेक अनोळखी लोकांच्या पोस्टचा महापूर आला आहे. ज्या पेजला युझर्स फॉलो करत आहेत, त्यावर या पोस्ट दिसत आहे. यासाठी अनेक जण ट्विटरवर पोस्ट करत आहेत. भारतीय वेळेनुसार जवळपास १२ च्या सुमारास ही समस्या सुरू झाली. Downdetector देखील लोकांनी याची तक्रार केली आहे. फेसबुकवर सुरू असलेल्या या प्रकाराबाबत कंपनीनंही कोणती माहिती दिली नाही.

Web Title: is facebook hacked news feed inundated with strange posts due to glitch know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.