iphone fest on amazon india | 'Apple Fest' ला झाली सुरूवात, सर्व iPhone वर बंपर डिस्काउंट 
'Apple Fest' ला झाली सुरूवात, सर्व iPhone वर बंपर डिस्काउंट 

मुंबई : जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.  इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सध्या अॅपल फेस्ट सुरू आहे. यामध्ये  iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone 7 Plus आणि  iPhone SE सह अनेक मॉडेल्सवर शानदार ऑफर्स मिळत आहेत. 9 डिसेंबरपर्यंत हा फेस्ट सुरू राहणार असून यामध्ये डिस्काउंट ऑफर्ससोबतच एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय या ऑफरही आहेत. शिवाय एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडिट कार्डने  iPhone खरेदी केल्यास 2 हजार रूपयांचं इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे.   

  •  आयफोन 8 प्लसच्या 64 जीबी व्हेरिअंटवर 3,315 रुपयांची सूट मिळत आहे, त्यामुळे हा फोन येथे 69 हजार 685 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 
  •  आयफोन 8 च्या 64 जीबी मॉडेलवर 4,610 रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. हा फोन  59 हजार 390 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 
  •  आयफोन 7 च्या 32 जीबी व्हेरिअंटवर 7000 रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन  41,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.  
  • आयफोन 7 प्लसवर 4,001 रुपयांची सूट मिळत असून, हा फोन 54,999 रुपयांमध्ये येथे उपलब्ध आहे. 
  •  3,001 रुपयांच्या डिस्काउंटसह iPhone 6S तुम्ही येथे  36,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.   
  •  iPhone 6 वर 3,510 रुपयांचं डिस्काउंट मिळत असून हा फोन येथे 25,990 रुपयांना उपलब्ध आहे.  
  •    6000 रुपयांच्या डिस्काउंटसह iPhone SE  तुम्हाला 20 हजार रूपयांत खरेदी करता येऊ शकतो. 

Web Title: iphone fest on amazon india
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.