iPhone 12 Pro वर आजवरची सर्वात मोठी सवलत!, किंमत ऐकून बसेल धक्का; अवघे काही तास शिल्लक...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 03:37 PM2022-01-01T15:37:50+5:302022-01-01T15:38:33+5:30

नव्या वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि अॅमेझॉननं आपल्या ग्रहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. अवघ्या काही तासांसाठी अॅमेझॉनवर iPhone 12 Pro वर मोठी सवलत दिली जात आहे.

iphone 12 pro amazing offer get upto rs 45000 off exchange offer included know details | iPhone 12 Pro वर आजवरची सर्वात मोठी सवलत!, किंमत ऐकून बसेल धक्का; अवघे काही तास शिल्लक...

iPhone 12 Pro वर आजवरची सर्वात मोठी सवलत!, किंमत ऐकून बसेल धक्का; अवघे काही तास शिल्लक...

googlenewsNext

नवी दिल्ली-

नव्या वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि अॅमेझॉननं आपल्या ग्रहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. अवघ्या काही तासांसाठी अॅमेझॉनवर iPhone 12 Pro वर मोठी सवलत दिली जात आहे. यात तुम्ही १,२९,९०० रुपये किमतीचा स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकणार आहात. आयफोनवर मिळणाऱ्या या सवलतीबाबत जाणून घेऊयात...

iPhone 12 Pro च्या 256GB व्हेरिअंटची मूळ किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये इतकी आहे. त्यावर २३ टक्के म्हणजेच जवळपास ३० हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. यानंतर या स्मार्टफोनची किंमत ९९,९०० रुपये इतकी झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही हा फोन नो-कॉस्ट EMI वरही विकत घेऊ शकणार आहात. 

एक्स्चेंज ऑफरसह iPhone 12 Pro वर मिळवा ४५ हजारांची सूट
आतापर्यंतच्या माहितीनुसार iPhone 12 स्मार्टफोन तुम्हाला १ लाख २९ हजार ९०० रुपयांऐवजी ९९,९०० रुपयांना खरेदी करता येत आहे. म्हणजेच तुम्हाला ३० हजार रुपयांची सूट मिळत आहे. पण तुमच्याकडे अॅपल कंपनीचा जुना आयफोन असेल तर तो एक्स्चेंज करुन नव्या फोनच्या किमतीत आणखी सूट मिळवू शकणार आहात. एक्स्चेंज ऑफरमध्ये जवळपास १४,९०० रुपयांचा फायदा मिळणार आहे. 

एक्स्चेंज ऑफरचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळाला तर एकूण मिळून iPhone 12 Pro वर तुम्हाला ४४,९०० रुपयांची सूट मिळू शकते. अशापद्धतीनं iPhone 12 Pro स्मार्टफोन तुम्ही अवघ्या ८५ हजार रुपयांना विकत घेऊ शकणार आहात. 

iPhone 12 Pro चे फिचर्स
आयफोनच्या 12 Pro च्या 256GB व्हेरिअंटमध्ये A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. यात 12MP चा अल्ट्रावाइड, वाइड आणि टेलीफोटो कॅमेरा, 4x ऑप्टिकल झूम रेंज, 12MP चा ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा आणि 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगची सुविधा मिळणार आहे. 5G सेवेचा सपोर्ट करणारा अॅपलचा हा स्मार्टफोन iPhone 6.1 इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह उपलब्ध आहे. तसंच यात दोन सिमकार्डचा पर्याय उपलब्ध आहे. अॅमेझॉनची ही जबरदस्त ऑफर आज रात्री १२ वाजेपर्यंतच सुरू असणार आहे. 

Web Title: iphone 12 pro amazing offer get upto rs 45000 off exchange offer included know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.