लाइव न्यूज़
 • 10:53 PM

  नवी दिल्ली : फिट इंडिया मोहीमेच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची हजेरी. सुनील शेट्टी, मिलिंद सोमण आणि गुल पनाग यांचा सहभाग

 • 10:40 PM

  जम्मू काश्मीर : पोलिसांच्या दोन रायफल घेऊन दहशतवादी फरार. अनंतनाग येथील घटना.

 • 10:18 PM

  भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग

 • 10:03 PM

  लातूर : किनगावात तीन घरे फोडली; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.

 • 09:58 PM

  गोवा : सामूहिक बलात्कारप्रकरणी मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक.

 • 09:11 PM

  जम्मू-काश्मीर : कुलगाममधील खुदवानी येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार.

 • 08:58 PM

  मेट्रो-3 च्या पॅकेज-4 मधील 'कृष्णा-1' टीबीएमकडून शीतलादेवी स्थानकापर्यंतचा 852 मीटर अंतराचा बोगदा पूर्ण. दादर स्टेशन 1642 मीट पर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी 'कृष्णा-1'सज्ज. आत्तापर्यंत 8 मशिनद्वारे 3 किमी भुयारीकरण पूर्ण.

 • 08:52 PM

  कर्नाटक : आर. आर. नगरमध्ये भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी केला भाजपा उमेदवार मुनिराजु गौडांचा प्रचार.

 • 08:49 PM

  सचिन तेंडुलकरचे विमान पुन्हा नागपूरकडे रवाना.

 • 08:06 PM

  मालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.

 • 07:54 PM

  नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.

 • 07:44 PM

  आयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.

 • 07:28 PM

  नागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.

 • 07:11 PM

  मुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.

 • 07:05 PM

  ओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

All post in लाइव न्यूज़