इंटेक्सचा किफायतशीर अ‍ॅक्वा ज्वेल २ स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: November 14, 2017 01:56 PM2017-11-14T13:56:38+5:302017-11-14T13:57:44+5:30

इंटेक्स कंपनीने आपल्या इंटेक्स अ‍ॅक्वा ज्वेल २ या स्मार्टफोनची आपल्या संकेतस्थळावर लिस्टींग केली असून लवकरच हे मॉडेल ग्राहकांना मिळणार आहे.

Intex's lucrative Aqua Jwell 2 smartphone | इंटेक्सचा किफायतशीर अ‍ॅक्वा ज्वेल २ स्मार्टफोन

इंटेक्सचा किफायतशीर अ‍ॅक्वा ज्वेल २ स्मार्टफोन

Next

इंटेक्स कंपनीने आपल्या इंटेक्स अ‍ॅक्वा ज्वेल २ या स्मार्टफोनची आपल्या संकेतस्थळावर लिस्टींग केली असून लवकरच हे मॉडेल ग्राहकांना मिळणार आहे.

इंटेक्स कंपनीच्या अ‍ॅक्वा मालिकेतील अन्य स्मार्टफोनप्रमाणे अ‍ॅक्वा ज्वेल २ हे मॉडेलदेखील एंट्री लेव्हल अर्थात किफायतशीर दरातले आहे. संकेतस्थळावरील लिस्टिंगनुसार याचे मूल्य ५,८९९ रुपये इतके असेल. हा स्मार्टफोन शँपेन आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

इंटेक्स अ‍ॅक्वा ज्वेल २ या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर स्प्रेडट्रम प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असेल. यातील कॅमेर्‍यामध्ये फेस डिटेक्शन, पॅनोरामा आणि बर्स्ट मोड दिलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यात २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.

Web Title: Intex's lucrative Aqua Jwell 2 smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.