सावधान! Google Chrome देशासाठी धोकादायक?; सरकारने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 04:02 PM2024-02-13T16:02:21+5:302024-02-13T16:13:17+5:30

गुगल क्रोममध्ये सिक्योरिटी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुमची महत्त्वाची पर्सनल माहिती चोरली जाऊ शकते.

indian government warning to google chrome users | सावधान! Google Chrome देशासाठी धोकादायक?; सरकारने दिला गंभीर इशारा

सावधान! Google Chrome देशासाठी धोकादायक?; सरकारने दिला गंभीर इशारा

जर तुम्ही Google Chrome युजर्स असाल म्हणजेच तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोमचा वापर करत असाल तर सावध राहा, कारण गुगल क्रोम भारतासाठी धोकादायक ठरू शकतं. अशा परिस्थितीत गुगल क्रोमबाबत सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुगल क्रोमने जवळपास 66 टक्के सर्च मार्केट व्यापलं आहे. त्यामुळेच सर्व मोबाईल, लॅपटॉप आणि कॉप्यूटर युजर्सनी लक्ष देणं आवश्यक आहे. 

गुगल क्रोममध्ये सिक्योरिटी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुमची महत्त्वाची पर्सनल माहिती चोरली जाऊ शकते. सरकारच्या म्हणण्यानुसार, गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत. भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने हा इशारा जारी केला आहे. 

भारत सरकारच्या सायबर सिक्युरिटी एजन्सीचं म्हणणं आहे की Google Chrome ला रिमोटली कंट्रोल केलं जाऊ शकतं. तसेच, त्यात मॅलेशियस कोड टाकला जाऊ शकतो. अशा प्रकारे हॅकर्स युजर्सचा संवेदनशील डेटा चोरू शकतात. CERT-In ने एक सिक्योरिटी एडवायजरी जारी केली आहे, ज्यामध्ये अटॅकर्स वेब पेजवर अटॅक करू शकतात.

काय केलं पाहिजे?

- इंटरनेट ब्राउजिंग करताना युजर्सनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे.
- तुम्ही कोणत्याही अनोळखी वेबसाइटला भेट देत असाल तर त्या वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
- युजर्सनी कोणत्याही थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करणं टाळावं.
- अनावश्यक ईमेल किंवा मेसेजना उत्तर देऊ नये. इतरांशी संवाद करणं टाळा.
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा Google Chrome ब्राउझर वेळोवेळी अपडेट करत राहा. 
 

Web Title: indian government warning to google chrome users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल