व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडीओ डाऊनलोड करायचाय?... एकदम सोप्पंय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 05:30 PM2018-07-03T17:30:46+5:302018-07-03T17:40:51+5:30

आता आपल्याला व्हॉ़ट्सअॅप स्टेटसवरील व्हिडीओही डाऊनलोड करता येणार

this is how you can download video from whatsapp status 1 | व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडीओ डाऊनलोड करायचाय?... एकदम सोप्पंय!

व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडीओ डाऊनलोड करायचाय?... एकदम सोप्पंय!

Next

नवी दिल्ली :  व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल साईटवर अनेक जण स्टेटस ठेवत असतात. कधी कधी त्यातील एखादा फोटो किंवा व्हिडीओ आपल्याला अधिकच आवडतो. मात्र तो व्हिडीओ डाऊऩलोड करणं शक्य नसल्याने अनेक युजर्स नाराज होतात. पण आता आपल्याला व्हॉ़ट्सअॅप स्टेटसवरील व्हिडीओही डाऊनलोड करता येणार आहेत. 

व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय मॅसेंजिंग अॅप म्हणून ओळखलं जातं. व्हॉट्सअॅप सातत्याने त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. 2017 मध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांनी 'स्टोरी' फिचर लाँच केले होते. मात्र त्यावेळी व्हॉट्सअॅपवर फक्त टेक्स्टमध्ये स्टेटस पोस्ट करता येत असे. त्यानंतर आता फोटो, व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आवडलेला व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडीओ असा करा डाऊनलोड

-  जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखादी स्टेटस स्टोरी पाहता त्यावेळी ती फोनमध्ये डाऊनलोड होतेच. फोनमधील .statuses या फोल्डरमध्ये ही स्टोरी सेव्ह होते. मात्र हे फोल्डर हिडन असल्यामुळे ते फाईल मॅनेजरमध्ये दिसत नाही. त्यामुळे या फोल्डर 'अनहाइड' करावे लागेल. यानंतर तुम्हाला कोणत्याही स्टोरीचा व्हिडीओ आणि फोटो सेव्ह करता येईल. फोल्डर 'अनहाइड' करण्यासाठी स्टोरेजमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप क्लिक करा. त्यानंतर उजवीकडे सेटिंगवर टॅप करून Show Unhide Files' वर क्लिक करावे. 

- त्याशिवाय, प्ले स्टोअरवर अशी काही अॅप्स आहेत, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअॅप स्टेटसमधील व्हिडीओ डाऊनलोड करता येतील. यामध्ये Story Saver for WhatsApp नावाचे अॅप सध्या लोकप्रिय आहे. एकदा हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते आपोआपच तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटला कनेक्ट होईल. त्यानंतर हव्या असलेल्या स्टोरीवर क्लिक करून ती स्टोरी डाऊनलोड करता येऊ शकते.


 

Web Title: this is how you can download video from whatsapp status 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.