जीमेल आता अधिक डायनामिक रूपात

By अनिल भापकर | Published: March 28, 2019 02:16 PM2019-03-28T14:16:51+5:302019-03-28T14:19:02+5:30

जीमेल ने आपल्या नाव लौकिकाला साजेशी आपली ई-मेल सेवा अधिक डायनामिक रूपात आणण्यासाठी एएमपी सपोर्ट सुद्धा सुरु केला आहे.

Google is rolling out AMP for Gmail | जीमेल आता अधिक डायनामिक रूपात

जीमेल आता अधिक डायनामिक रूपात

Next
ठळक मुद्देई-मेल सेवा अधिक डायनामिक रूपात आणण्यासाठी एएमपी सपोर्ट सुद्धा सुरु अगोदर एएमपी सपोर्ट हि सुविधा फक्त डेस्कटॉप जीमेल व्हर्जन साठीच असेल आणि नंतर मोबाइल जीमेल ऍप साठी सुद्धा हि एएमपी सपोर्टची सुविधा चालू होईल सध्या तरी एएमपी सपोर्टची सुविधा बिटा व्हर्जन मध्ये फक्त जी-सूट युझर्सला देण्यात आली आहे

अनिल भापकर

जेव्हा गुगलने  जी-मेल च्या माध्यमातून ई-मेल सेवेमध्ये प्रवेश केला तेव्हा सुरुवातीला  प्रति युझर १ जीबी स्टोरेज कॅपॅसिटी  जी-मेल कडून देण्यात येत होती जी त्यावेळच्या इतर कुठल्याही ई-मेल सेवा देणाऱ्यापेक्षा खूप जास्त होती . त्यामुळे  जी-मेल अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले.अजूनही  ई-मेल सेवा देण्यामध्ये जी-मेलची सेवा वरचढच आहे. आता जीमेल ने आपल्या नाव लौकिकाला  साजेशी आपली  ई-मेल सेवा अधिक डायनामिक रूपात आणण्यासाठी एएमपी सपोर्ट सुद्धा सुरु केला आहे.

काय आहे एएमपी सपोर्ट?

गुगलची इनबॉक्स हि  ई-मेल सेवा ०२ एप्रिल २०१९ पासून बंद करण्यात येईल .गुगलच्या या निर्णयाने खरे तर टेक्नोसॅव्ही जगतामध्ये मोठी खळबळ उडाली होती. ३१ मार्च २०१९ पर्यंतच इनबॉक्सची सेवा बंद होणार होती मात्र गुगलने आणखी दोन दिवसाची मुदतवाढ देत आता ०२ एप्रिल २०१९ रोजी इनबॉक्सची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आह.त्यामुळे आता गुगल आपले अधिकाधिक लक्ष जीमेल या आपल्या  ई-मेल सेवेवर केंद्रित करणार हे  टेक्नोसॅव्ही मंडळीला माहित होते. त्यामुळे जीमेल कडून कोणत्या तरी मोठ्या घोषणेची अपेक्षा होतीच . त्याप्रमाणेच  गुगल आता एएमपी सपोर्ट हि सुविधा जीमेलला देणार आहे.एएमपी ( Accelerated Mobile Pages ) सपोर्ट मुळे आता जीमेल युझर्सला एखाद्या लिंक ची ब्राउजिंग ,किंवा एखादा फॉर्म भरणे यासह अनेक गोष्टी आता जीमेलच्या इनबॉक्स मध्येच करता येणार आहे. यापूर्वी जर तुम्हाला एखादी लिंक ई-मेलच्या इनबॉक्स मध्ये आली आणि तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले तर ती लिंक ब्राऊजर मध्ये ओपन होत होती आता मात्र या एएमपी सपोर्ट मुळे हि लिंक तुमच्या इनबॉक्स मध्येच ओपन होईल.

अगोदर एएमपी सपोर्ट हि सुविधा फक्त डेस्कटॉप जीमेल व्हर्जन साठीच असेल आणि नंतर मोबाइल जीमेल ऍप साठी सुद्धा हि एएमपी सपोर्टची सुविधा चालू होईल असे गुगल तर्फे कळविण्यात आले आहे. सध्या तरी एएमपी सपोर्टची सुविधा बिटा व्हर्जन मध्ये फक्त जी-सूट युझर्सला देण्यात आली आहे. मात्र लवकरच आपल्या सगळ्यांना आपल्या जीमेल मध्ये एएमपी सपोर्ट हि सुविधा वापरायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. 

anil.bhapkar@lokmat.com

Web Title: Google is rolling out AMP for Gmail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.