Google ने 'या' ॲप्सवर घातली बंदी! ३१ 'मे' पासून होणार बंद, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:35 PM2023-06-02T12:35:58+5:302023-06-02T12:39:40+5:30

Google ने वैयक्तिक कर्ज देणार्‍या अॅप्सवर बंदी घातली आहे. हे अॅप्स ३१ मे २०२३ नंतर वापरता येणार नाहीत.

google ban personal loan apps from 31 may 2023 delete these apps from phone | Google ने 'या' ॲप्सवर घातली बंदी! ३१ 'मे' पासून होणार बंद, नेमकं प्रकरण काय?

Google ने 'या' ॲप्सवर घातली बंदी! ३१ 'मे' पासून होणार बंद, नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

गुगलने ऑनलाइन पर्सनल लोन अॅप्सवर बंदी घातली आहे. ३१ मे नंतर कर्ज देणारे अॅप बंद झाली आहे. गुगल या नियमाची कडक अंमलबजावणी करणार आहे. या अॅप्सवर ग्राहकांना खोटे दावे करून चुकीच्या पद्धतीने कर्ज वसूल केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत गुगलने वैयक्तिक कर्ज देणाऱ्या अॅप्सच्या नियमांमध्ये बदल केला आहे. या अॅप्सवर वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरून ती वैयक्तिक माहिती कर्ज वसुलीसाठी वापरल्याचा आरोप आहे.

बापरे! तंत्र-मंत्र की कोरोनाची भीती? पत्नी-मुलांना 4 वर्षे घरात ठेवलं कोंडून; झाली भयंकर अवस्था

लेंडिंग अॅपला फोटो आणि संपर्कांसारख्या संवेदनशील डेटामध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित आहे. गुगलच्या रिपोर्टनुसार, हे नियम कर्ज देणाऱ्या अॅप्सना लागू होतील, जे थेट कर्ज देतात. तसेच जे लीड जनरेटर आहेत आणि जे ग्राहकांना थर्ड पार्टी लेंडिंगसह जोडतात.

जर आपण भारताबद्दल बोललो तर येथे कोणत्याही अॅपला वैयक्तिक कर्ज देण्याची परवानगी नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून परवाना असणारे अॅप्सच वैयक्तिक कर्ज देऊ शकतील. या प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुगलकडून उत्तर मागितले होते, ज्याच्या उत्तरात गुगलने सांगितले की, असे सुमारे २००० अॅप्स आपल्या बाजूने काढून टाकण्यात आले आहेत. तसेच, प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील कारवाई केली जाईल.

Web Title: google ban personal loan apps from 31 may 2023 delete these apps from phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल