गार्मिनचे विवोअ‍ॅक्टीव्ह ३ फिटनेस स्मार्टवॉच

By शेखर पाटील | Published: November 22, 2017 11:06 AM2017-11-22T11:06:52+5:302017-11-22T11:07:18+5:30

गार्मिन कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपले विवोअ‍ॅक्टीव्ह ३ फिटनेस स्मार्टवॉच सादर करण्याची घोषणा केली आहे.

Garmin's Vivoactive 3 Fitness Smartwatch | गार्मिनचे विवोअ‍ॅक्टीव्ह ३ फिटनेस स्मार्टवॉच

गार्मिनचे विवोअ‍ॅक्टीव्ह ३ फिटनेस स्मार्टवॉच

Next

भारतातील वेअरेबल्स प्रॉडक्टची बाजारपेठेत हळूहळू बाळसे धरत आहेत. अत्यंत किफायतशीर फिटनेस ट्रॅकर्स, फिटनेस बँडपासून ते प्रिमियम स्मार्टवॉचपर्यंतची उपकरणे भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात येत आहेत. अलिकडच्या काळाचा विचार केला असता स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकरमधील सर्व फीचर्सला एकत्र करून फिटनेस स्मार्टवॉचच्या स्वरूपात लाँच करण्याचा ट्रेंड आला आहे. या अनुषंगाने गार्मिन कंपनीने विवोअ‍ॅक्टीव्ह ३ हे फिटनेस स्मार्टवॉच भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. 

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ फिटनेस स्मार्टवॉच ग्राहकांना ब्लॅक (स्टेनलेस), व्हाईट (स्टेनलेस) आणि ब्लॅक (स्लेट) या तीन पर्यायांमध्ये २४,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. क्रोमासह देशभरातील निवडक शॉपीज तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून हे फिटनेस स्मार्टवॉच ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ फिटनेस स्मार्टवॉचमध्ये १.२ इंच आकारमानाचा व २४० बाय २४० पिक्सल्सचा गार्मिन क्रोमा डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. यात जीपीएसचा सपोर्ट देण्यात आला आहे. अन्य फिटनेस ट्रॅकरनुसार यात चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज,  निद्रेचे प्रमाण, हृदयाचे ठोके आदींचे मापन करता येणार आहे. यात रनिंग आणि स्विमिंगदरम्यान शरीरातील घडामोडींचे मापन करता येईल. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सात दिवसांपर्यंत स्मार्टवॉच मोडवर तर जीपीएससह 13 तासांपर्यंत वापरता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात गार्मिन पे या प्रणालीच्या मदतीने कॉन्टॅक्टलेस पेमेंटची व्यवस्थादेखील आहे. यात १५ स्पोर्टस अ‍ॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आलेली आहेत. वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ असल्यामुळे हे स्मार्टवॉच कोणत्याही वातावरणात वापरता येते. यावर याच्याशी संलग्न असणार्‍या स्मार्टफोनचे नोटिफिकेशन्स आणि कॉल्सची सुविधाही आहे.

Web Title: Garmin's Vivoactive 3 Fitness Smartwatch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.