ठळक मुद्देयातील लक्षणीय फिचर म्हणजे यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहेयाची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधायात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले

कोमिओ कंपनीने भारतीय ग्राहकांना आपला कोमिओ सी २ हा स्मार्टफोन ७,१९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे. कोमिओ कंपनीने अलीकडेच काही मॉडेल्सच्या माध्यमातून भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत पदार्पण केले आहे. यात आता सी २ या मॉडेलची भर पडली आहे. हादेखील तसा एंट्री लेव्हलपेक्षा थोड्या पुढील वर्गवारीतला स्मार्टफोन आहे. यातील लक्षणीय फिचर म्हणजे यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात मल्टी-टास्कींगचा वापर होत आहे. यात स्मार्टफोनवरून व्हिडीओ पाहण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा विचार करता बॅटरी हा कोणत्याही मॉडेलमधील महत्वाचा घटक ठरत असतो. याचा विचार करता कोमिओ सी २ या मॉडेलमधील दर्जेदार बॅटरी हा या मॉडेलचा सेलींग पॉइंट ठरू शकतो.

कोमिओ सी २ या मॉडेलमध्ये मीडीयाटेक एमटी ६७३७ हा प्रोसेसर असेल. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. यात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. यातील मुख्य व फ्रंट हे दोन्ही कॅमेरे प्रत्येकी ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.

कोमिओ सी २ हा स्मार्टफोन रॉयल ब्ल्यू आणि रॉयल ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासोबत कंपनीने ग्राहकांना काही ऑफर्स देऊ केल्या आहेत. यात युजरला सहा महिन्यापर्यंत एकदा स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा असेल. याशिवाय ग्राहकाला एक वर्ष आणि वर १०० दिवस इतकी वॉरंटीदेखील प्रदान करण्यात आली आहे. तर जुन्या फोनच्या बदल्यात ग्राहकाला बायबॅक ऑफरही मिळेल. तर डाटा पॅकबाबत रिलायन्सच्या जिओसोबत करारदेखील करण्यात आला आहे.