सावधान..! मोबाइलच्या अतिवापराने आळसावतो आपला मेंदू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 12:13 AM2018-03-26T00:13:38+5:302018-03-26T00:13:38+5:30

मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही.

Careful ..! Your brain loses mobile usage! | सावधान..! मोबाइलच्या अतिवापराने आळसावतो आपला मेंदू!

सावधान..! मोबाइलच्या अतिवापराने आळसावतो आपला मेंदू!

googlenewsNext

नवी दिल्ली: मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही. स्मार्टफोन हा जणू शरीराचा एक अवयव झाला
आहे! अठरापगड कामांचा व्याप असला तरी एक डोळा मोबाइलवर असतो आणि मेंदूचा एक कोपरा जणू मोबाइल फोनने व्यापलेला असतो. मात्र मोबाइल फोनवर आपण जितके अवलंबून राहू, त्याच्यात गुंतत जाऊ तेवढा आपला मेंदू आळशी बनतो.
मोबाइल कितीही सोयीचा वाटत असला तरी त्याकडेच सतत लक्ष देणे हे शरीरस्वास्थ्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होतात. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. श्वास रोखला जातो. मोबाइल फोनवर जे संदेश किंवा कॉल येतात त्यांना प्रतिसाद द्यावा म्हणून शरीरातील घटक अशारितीने सक्रिय होतात असे अजिबात नाही. उलट या गोष्टींना जलद प्रतिसाद देण्याची जी धडपड चालते त्यातल्या धोक्याचे संकेत शरीर अशा लक्षणांद्वारे देत असते.

सर्च इंजिनहून पुस्तक सरस
प्रत्येक संकेदाला ६० बीट या वेगाने आपला मेंदू माहिती ग्रहण करु शकतो. कामाचे खूप ओझे असेल तर मेंदूला अधिक ताण द्यावा लागेल. त्यामुळे मोबाइल फोनच्या सहाय्याने यातील अतिरिक्त कामांचा उरक करण्याकडे कोणाचाही कल असू शकतो. मात्र या कृतीमुळे मेंदू शिणतो व आळशीही बनतो. यासंदर्भात काही संशोधनही झाले आहे. संशोधक, विचारवंत असे बुद्धिमान लोक आपल्या मोबाइल फोनमधील सर्च इंजिनचा इतर लोकांपेक्षा खूप कमी वापर करतात. मोबाइलफोनवर इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीच्या माहितीचा शोध घेतल्याने कोणीही कमी बुद्धिचा ठरत नाही. मात्र बुद्धिमान लोकांना जास्त गोष्टींची माहिती असल्याने ते सर्च इंजिनचा कमी वापर करतात ही वस्तुस्थिती आहे.

सतत स्मार्टफोन वापरल्यामुळे मेंदू तणावग्रस्त होतो. बोटेही शिणतात, असा निष्कर्ष स्वित्झर्लंडमधील स्मार्टफोन वापरणाऱ्यांची अलीकडेच पाहणी करण्यात आली, त्यानंतर काढण्यात आला. मोबाइलवर सतत टाइप करत राहिल्याने, सोशल मीडियामध्ये गुरफटून राहिल्याने किंवा स्क्रोलिंग करणाºयांच्या मेंदूवर जास्त आघात होतो.

Web Title: Careful ..! Your brain loses mobile usage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.