BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन; फक्त 107 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता आणि बरेच काही…

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:06 PM2023-01-10T14:06:05+5:302023-01-10T14:06:35+5:30

bsnl cheapest recharge plan : तुम्हीही बीएसएनएल कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हीही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता.

bsnl cheapest recharge plan with maximum benifits | BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन; फक्त 107 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता आणि बरेच काही…

BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन; फक्त 107 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता आणि बरेच काही…

googlenewsNext

नवी दिल्ली : जिओपासून व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल सारख्या कंपन्या देखील रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत, परंतु जेव्हा ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन रिचार्ज प्लॅनचा विचार केला जातो, तेव्हा अशा काही कंपन्या आहेत, ज्या या कॅटगरीत मोडतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दीर्घ वैधता प्लॅनची किंमत कधीकधी थोडी जास्त असते. 

अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी बीएसएनएलचा (BSNL) असा शक्तिशाली रिचार्ज प्लॅन आणला आहे, जो किफायतशीर तर आहेच पण त्याची वैधता जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ग्राहकांना खुश करण्यासाठी आता बीएसएनएलने देखील एक स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. यामध्ये कमी किमतीत ३ महिन्यांची मुदत मिळत आहे. 

तुम्हीही बीएसएनएल कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हीही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. तसेच या योजनेमुळे तुमच्या पैशांची देखील बचत होणार आहे. 150 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये कंपनीकडून रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आले आहेत. बीएसएनएल कंपनीने 150 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये प्लॅन आणला आहे. यामध्ये 107 रुपयांच्या रिचार्जमध्ये 1GB डेटा सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय इतरही अनेक सुविधा दिल्या जातात. 

बीएसएनएल कंपनीकडून सर्वात कमी आणि जास्तीत जास्त दिवस चालणारा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 1GB डेटा सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक दीर्घ वैधता प्लॅन आहे. यामध्ये, प्लॅन 84 दिवसांच्या म्हणजेच सुमारे 3 महिन्यांच्या वैधतेसह येतो. सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा प्लान सर्वोत्तम असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: bsnl cheapest recharge plan with maximum benifits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.